India vs West Indies Test: यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्माचा कहर! रचले अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड्स

India vs West Indies Test: वेस्ट इंडिजविरोधात (West Indies) डोमिनिकामधील कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैसवालने (Yashasvi Jaiswal) जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं आहे. पहिल्याच सामन्यात शतक ठोकत त्याने अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड्सची नोंद केली आहे. दुसरीकडे रोहित शर्मानेही (Rohit Sharma) गोलंदाजांचा समाचार घेत शतक ठोकलं.   

शिवराज यादव | Updated: Jul 14, 2023, 07:49 AM IST
India vs West Indies Test: यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्माचा कहर! रचले अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड्स title=

India vs West Indies Test: वेस्ट इंडिजविरोधात (West Indies) डोमिनिकामधील कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैसवालने (Yashasvi Jaiswal) जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं आहे. यशस्वी जैसवालने पहिल्याच सामन्यात शतक ठोकत त्याने अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड्सची नोंद केली आहे. दुसरीकडे रोहित शर्मानेही (Rohit Sharma) गोलंदाजांचा समाचार घेत शतक ठोकलं. 

भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान दोन कसोटी सामन्यांमधील पहिला सामना डोमिनिका येथे खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने पहिल्या डावात 2 विकेट गमावत 312 धावा ठोकल्या. ओपनर यशस्वी जैसवाल (143) आणि विराट कोहली (36) नाबाद आहेत. 

162 धावांची आघाडी

भारताने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिज संघ 150 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे आता भारतीय संघाकडे 162 धावांची आघाडी आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 221 चेंडूत 103 धावांची शतकी खेळी केली. तर युवा खेळाडू यशस्वी जैसवालने पदार्पणातील सामन्यातच शतक ठोकत इतिहास रचला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वीने 350 चेंडूत 143 धावा ठोकल्या होत्या. त्याने 14 चौकार लगावले. या खेळीसह यशस्वी जैसवालने आपल्या नावे अनेक रेकॉर्ड केले आहेत. 

विदेशी जमीनवर शतक ठोकणारा पहिला भारतीय ओपनर

विदेशी मैदानावर शतक ठोकणारा यशस्वी जैसवाल पहिला भारतीय ओपनर ठरला आहे. यााधी सुधीर नायर यांनी इंग्लंडमध्ये (1974) 77 धावा ठोकल्या होत्या. तसंच सुनील गावस्कर यांनी डेब्यू सामन्यात 65 धावा ठोकल्या होत्या. यशस्वीने सर्वांनाच दणका दिला आहे. तसं पाहायला गेल्यास शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनीही डेब्यू टेस्ट सामन्यात शतक ठोकलं होतं. पण हे शतक घरगुती मैदानावर ठोकण्यात आलं होतं. 

टेस्ट डेब्यूत शतक ठोकणारे युवा भारतीय

18 वर्ष 329 दिवस - पृथ्वी शॉ vs वेस्टइंडिज, राजकोट, 2018
20 वर्ष 126 दिवस  - अब्बास अली बैग vs इंग्लंड, ओल्ड ट्रेफर्ड, 1959
20 वर्ष 276 दिवस - गुंडप्पा विश्वनाथ vs ऑस्ट्रेलिया, कानपुर, 1969
21 वर्ष196 दिवस - यशस्वी जायसवाल vs वेस्टइंडिज, रोसीयू, 2023
21 वर्ष 327 दिवस - मोहम्मद अझहरुद्दीन vs इंग्लंड, कोलकाता, 1984 

यशस्वी आणि रोहितने मोडला 21 वर्षं जुना रेकॉर्ड

रोहित आणि यशस्वीने पार्टनरशिपचाही रेकॉर्ड केला आहे. दोघांनी वेस्ट इंडिजविरोधात सर्वात मोठी भागीदारी रचली आहे. रोहित शर्मा आणि यशस्वीने 229 धावांची ओपनिंग पार्टनरशिप केली. यासह त्यांनी विरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर यांचा 201 धावांचा रेकॉर्ड मोडला आहे. 2002 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात त्यांनी हा रेकॉर्ड रचला होता.