भारत वि. वेस्ट इंडिज शेवटची वनडे, भारतासाठी विजय आवश्यक

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना सबिना पार्क ग्राउंडवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. चौथ्या एकदिवसीय सामन्यांत पराभव झाल्यानंतर टीम इंडियाला सिरीज आपल्या नावे करण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. तर वेस्ट इंडिज सिरीजला ड्रॉ करण्यासाठी मैदानात उतरेल.

Updated: Jul 6, 2017, 10:07 AM IST
भारत वि. वेस्ट इंडिज शेवटची वनडे, भारतासाठी विजय आवश्यक title=

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना सबिना पार्क ग्राउंडवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. चौथ्या एकदिवसीय सामन्यांत पराभव झाल्यानंतर टीम इंडियाला सिरीज आपल्या नावे करण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. तर वेस्ट इंडिज सिरीजला ड्रॉ करण्यासाठी मैदानात उतरेल.

या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे आणि आजचा शेवटचा एकदिवसीय सामना जिंकत येत्या भारत सिरीज जिंकू शकतो. कोणत्या कारणाने सामना ड्रॉ जरी झाला तरी भारत सिरीज आपल्या नावे करेल.

सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये दोन सामने जिंकून भारताने मालिकेवर चांगली पकड बनवली होती. पण त्यानंतर भारताला पराभवाचा सामना करावा लागला. चौथ्या वनडेमध्ये भारतीय टीम १९० रन नाही करु शकली. संपूर्ण टीम १७८ रनवर ऑलआऊट झाली होती.