भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज पाचवी वन-डे

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवी वन-डे अँटिग्वामध्ये खेळवली जाणार आहे. 

Updated: Jul 6, 2017, 09:51 AM IST
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज पाचवी वन-डे  title=

अँटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवी वन-डे अँटिग्वामध्ये खेळवली जाणार आहे. 

टीम इंडिया सीरिज जिंकण्याच्या उद्देशानचं मैदानात उतरेल. तर यजमान वेस्ट इंडिज टीम सीरिजमध्ये बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेला. पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये कोहली अँड कंपनी 2-1 नं आघाडीवर आहे. 

चौथी वन-डे जिंकत कॅरेबियन टीमने सीरिजमध्ये कमबॅक केले आहे. आता अखेरच्या वन-डेतही विंडीजची टीम भारतीय टीमला कडवी टक्कर देण्यास सज्ज आहे. 

भारतीय टीम फॉर्मात आहे. त्यामुळे कोहलीच्या टीमलाच विजयासाठी अधिक संधी आहे. आता टीम इंडिया आणखी एका सीरिजला गवसणी घालते का याकडेच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.