Who is jeffrey vandersay: टी 20 सिरिजमध्ये श्रीलंकेला एकहाती धूळ चारणारी टीम इंडिया वनडे मॅचमध्ये श्रीलंकेसमोर गडबडलेली दिसली. श्रीलंका आणि टीम इंडियामध्ये दुसरा एकदिवसीय सामना श्रीलंकेने खिशात टाकला. घातक बॉलर्सच्या मदतीने तीन मॅचच्या सिरिजमध्ये श्रीलंकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने टीम इंडिया 32 रन्सने हरवले. दोघांमधील सिरिजचा पहिला सामना टाय झाला होता. श्रीलंकेच्या टीमने टॉस जिंकून पहिली बॅटींग करत 50 ओव्हरमध्ये 9 विकेटच्या बदल्यात 240 रन्सचा स्कोर उभा केला. याचे उत्तर देताना टीम इंडियाने केवळ 208 रन्स केले. श्रीलंकेच्या जेफरी वांडर्सने 6 विकेट घेत टीम इंडियाची बॅटींग ऑर्डर उद्ध्वस्त केली. लकेंच्या या टीम इंडियासाठी अनोळखी बॉलरने अचानकमध्ये भयानक कार्यक्रम केला. पण कोण आहे हा जेफरी वेंडरसे? जाणून घेऊया.
श्रीलंका आणि टीम इंडियामध्ये खेळला गेलेला दुसरा सामना 'अनोळखी' लेग स्पिनरने आपल्या नावावर केला. जेफरी वेंडरसे असे त्याचे नाव आहे. आपल्या घातक बॉलिंगने त्याने सर्वांनाच हैराण केले. हळुहळू त्याने टीम इंडियाच्या बॅटींग ऑर्डरला सुरुंग लावयला सुरुवात केली. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल अशी एकामागोमाग रांगच लागली. कोणच त्याच्यासमोर टिकू शकत नव्हता. टीम इंडियाच्या अर्ध्या बॅट्समन्सना त्याने तंबूत परत पाठवले.
श्रीलंकेच्या 34 वर्षांच्या अनुभव लेग स्पिनर जेफरीने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये धमाल उडवून दिली. मैदानात तो वादळ घेऊन आला. जेफरी वेंडरर्सने टीम इंडियाच्या कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, शिवम दुबे, श्रेयश अय्यर आणि केएल राहुल यांना सहज खिशात टाकले. जेफरी वेंडरर्सने आपल्या 10 ओव्हरमध्ये अवघे 33 रन्स दिले.
34 वर्षाच्या लेग स्पिनर जेफरी वेंडरर्सने श्रीलंका टीममध्ये 2015 मध्ये डेब्यू केला होता. श्रीलंकेसाठी खेळतान 22 वनडेमध्ये 27 विकेट, 14 टी 20 सामन्यात 7 विकेट तर एकच टेस्ट मॅच खेळून त्यात 2 विकेट घेतली. त्याने टिम इंडियाविरुद्ध याआधी देखील एक सामना खेळला होता. पण त्या मॅचमध्ये को काही कमाल करु शकला नव्हता.
श्रीलंकेचा स्टार आणि अनुभवी खेळाडू वनिंदु हसरंगा जखमी असल्याने दुसऱ्या वनडेपासून सिरीजमधून बाहेर आहे. त्याच्याजागी जेफरी वेंडरर्सला स्क्वॉडमध्ये जागा मिळाली. तो प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळला आणि त्याने कमाल करुन दाखवली.