SL vs IND 2nd ODI Playing XI : रोहित शर्माने दुसऱ्या ODI मध्ये केला मोठा बदल, 'या' खेळाडूची प्लेइंग 11 मधून सुट्टी?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील आज दुसरा सामना रंगणार आहे. पहिला सामना टाय झाल्यामुळे आजचा सामना जिंकणे टीम इंडियासाठी गरजेचे आहे. अशा स्थितीत कॅप्टन रोहित शर्माने रणनिती आखलीय. 

नेहा चौधरी | Updated: Aug 4, 2024, 11:18 AM IST
SL vs IND 2nd ODI Playing XI : रोहित शर्माने दुसऱ्या ODI मध्ये केला मोठा बदल, 'या' खेळाडूची प्लेइंग 11 मधून सुट्टी? title=
india vs sri lanka

भारत आणि श्रीलंकामधील दुसऱ्या वनडे (SL vs IND 2nd ODI ) सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झालीय. आज कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियमवर 3 वनडे सामन्यातील दुसरा सामना रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना टाय झाल्यामुळे आजचा सामना दोन्ही संघाला जिंकून आघाडी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मानेही विजयासाठी रणनिती आखली आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 पासून खेळवला जाणार आहे. 

ऋषभ पंत प्लेइंग-11 मध्ये एन्ट्री?

भारत आणि श्रीलंकामधील दुसऱ्या वनडे सामन्यासाठी चाहत्यांच्या नजरा दोन्ही संघांच्या प्लेइंग-11 वर (SL vs IND 2nd ODI Playing XI) लागल्या आहेत. फिरकीपटूंविरुद्ध चांगला रेकॉर्ड असलेल्या ऋषभ पंतला या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग-11 मध्ये एन्ट्री मिळण्याची शक्यता आहे. स्पिनर विरुद्धात पंतची खेळी कायम अप्रतिम राहिली आहे. पण पंतची प्लेइंग-11 मध्ये एन्ट्री झाल्यास शिवम दुबेला बाहेर बसावे लागू शकतं. शिवमने पहिल्या वनडेत 19 धावांत एक विकेट घेतली होती. तर त्याच्या बॅटिंगबद्दल बोलायचं झालं तर त्याने 25 रन्स काढले होते. दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघातही एक बदल झाला असून वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे उर्वरित दोन सामन्यांतून बाहेर असणार आहे. 

भारताला श्रीलंकेविरुद्ध आपला दबदबा कायम ठेवायचा असेल तर त्याला फिरकीपटू आणि संथ खेळपट्टीला सामोरे जाण्याचा मार्ग शोधावा लागणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात 130 धावा करून चांगल्या स्थितीत होती. मात्र श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज वरचढ ठरले आणि भारतीय संघ 230 धावांवर गुंडाळले. त्यामुळे पहिला सामना हा बरोबरीत सुटला. रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली, पण यानंतर श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी आपली रणनीती चोख राबवली आणि हाता तोंडाशी आलेला विजय भारतीय संघाकडून निसटला. (india vs sri lanka Rohit Sharma makes big change in 2nd ODI shivam dube left from playing XI and rishabh pant in )

हेसुद्धा वाचा - BCCI लवकरच भारतीय क्रिकेटपटूंना देणार मोठं गिफ्ट, जय शाह यांची मोठी घोषणा

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचे संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सादिरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, दुनिथ वेलालागे, अकिला धनंजय, महिष तिक्षिना, अशित फर्नांडो, शिनांद.