भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून पहिला सामना हा टाय झाला. हातातोंडाशी आलेला घास एका विकेटमुळे भारतीय संघाने गमावला. विजयासाठी एक रन्सची आवश्यकता असताना विकेट गेल्याने हा सामना टाय झाला. आज भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा वनडे सामना होणार आहे. त्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय क्रिकेटपटूंना मोठी भेट दिलीय. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केलीय. या गिफ्टमुळे भारतीय क्रिकेटची उन्नती होणार असून खेळाडूंना आधुनिक सुविधा मिळणार आहे.
जय शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलंय की, 'BCCI नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) जवळजवळ पूर्ण झाली असून लवकरच बेंगळुरूमध्ये तिचं ओपन होणार आहे, हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे. नवीन NCA मध्ये तीन जागतिक दर्जाचे खेळाचे मैदान, 45 सराव खेळपट्ट्या, इनडोअर क्रिकेट खेळपट्ट्या, एक ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव आणि अत्याधुनिक प्रशिक्षण, पुनर्प्राप्ती आणि क्रीडा विज्ञान सुविधा असतील. हा उपक्रम आपल्या देशातील वर्तमान आणि भविष्यातील क्रिकेटपटूंना शक्य तितक्या चांगल्या वातावरणात त्यांचे कौशल्य विकसित करण्यास मदत करेल!'
Very excited to announce that the @BCCI’s new National Cricket Academy (NCA) is almost complete and will be opening shortly in Bengaluru. The new NCA will feature three world-class playing grounds, 45 practice pitches, indoor cricket pitches, Olympic-size swimming pool and… pic.twitter.com/rHQPHxF6Y4
— Jay Shah (@JayShah) August 3, 2024
आम्ही तुम्हाला सांगूया की बेंगळुरूमध्ये आधीच आणखी एक राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) आहे. टीम इंडियाचा कोणताही खेळाडू दुखापत झाल्यास तो बरा होण्यासाठी एनसीएकडे जातो. त्याची स्थापना 2000 मध्ये झाली. हे एम चिन्नास्वामी स्टेडियम जवळ आहे. 2014 मध्ये बोर्डाने क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड यांच्याशी सहकार्य करून त्यांच्या नवीन संरचनेच्या निर्मितीवर तज्ज्ञांचे मत जाणून घेतलंय. सध्या माजी भारतीय क्रिकेटपटू VCS लक्ष्मण हे NCA चे प्रमुख आहेत.