श्रीलंका २०५ रन्सवर ऑल आऊट, भारतालाही एक धक्का

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेरीस भारतानं ११ रन्सच्या मोबदल्यात एक विकेट गमावली आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Nov 24, 2017, 04:43 PM IST
श्रीलंका २०५ रन्सवर ऑल आऊट, भारतालाही एक धक्का  title=

नागपूर : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेरीस भारतानं ११ रन्सच्या मोबदल्यात एक विकेट गमावली आहे. भारताचा ओपनर के.एल. राहुल ७ रन्सवर आऊट झाला. तर मुरली विजय नाबाद २ आणि चेतेश्वर पुजाराही नाबाद २ रन्सवर खेळत आहे.

या मॅचमध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण पहिल्याच दिवशी श्रीलंकेचा संघ २०५ रन्सवर ऑल आऊट झाला. भारताकडून आर. अश्विननं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या तर ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी ३ विकेट्स मिळाल्या. श्रीलंकेच्या दिनेश चंडीमलनं ५७ आणि करुणारत्नेनं ५१ रन्स बनवल्या.

या मॅचमध्ये भारतानं शिखर धवनऐवजी मुरली विजयला आणि भुवनेश्वर कुमारऐवजी रोहित शर्माला मैदानात उतरवलं आहे. भारत आणि श्रीलंकेमधली कोलकात्यात झालेली पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती.