कॅप्टन कूलची कन्या पोळ्या लाटते, 'गोल...गोल...'

आता झिवाच्या आणखी एका फोटोविषयी सोशल मीडियात चर्चा आहे. 

Updated: Nov 24, 2017, 02:45 PM IST
कॅप्टन कूलची कन्या पोळ्या लाटते, 'गोल...गोल...' title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्र सिंह धोनीची चिमुकली आपल्या फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आता झिवाच्या आणखी एका फोटोविषयी सोशल मीडियात चर्चा आहे. 

आईसोबत पोळ्या लाटतेय...गोल गोल

 

Round round Roti !

A post shared by ZIVA SINGH DHONI (@zivasinghdhoni006) on

झिवा किचनमध्ये घरात आपल्या आईसोबत पोळ्या लाटतेय. ही एवढीशी चिमुकली अगदी गोल आकाराची पोळी लाटतेय. झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. पोळ्या लाटण्यावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या झिवाचा हा नवा व्हिडिओ सर्वांना आश्चर्याचा धक्का देतो.

नेहमीच चर्चेत असते कॅप्टन कूलची कन्या

आपल्या लाडक्या बाबांसाठी मैदानात पाण्याची बाटली घेऊन धावत जाणारी झिवा, मल्याळममध्ये भक्तीगीत गाणारी झिवा,  कॅप्टन कूलसोबत लाडू गटकावणारी झिवा, असे अनेक नाना तऱ्हेचे अंदाज नेहमीच सगळ्यांना भावतात. 

आता झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फॉलोवर्सची सध्या ही ९५ हजारांहून अधिक आहे.