India vs Sri Lanka 3rd ODI: जेव्हा 'विराट' क्रीझवर असतो तेव्हा..., कोहलीच्या नावावर 10 दमदार रेकॉर्ड, पाहा यादी

Virat Kohli Century: नवीन वर्षातील पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने गुवाहाटी येथे श्रीलंकेविरुद्ध दणदणीत शतक झळकावले. 

Updated: Jan 16, 2023, 12:04 PM IST
India vs Sri Lanka 3rd ODI: जेव्हा 'विराट' क्रीझवर असतो तेव्हा..., कोहलीच्या नावावर 10 दमदार रेकॉर्ड, पाहा यादी title=

Virat Kohli Records: टीम इंडियाने (India vs Sri Lanka) 317 धावांनी श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. भारताचा वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. या विजयासह (India vs Sri Lanka) टीम इंडियाने श्रीलंकेला 3-0 ने व्हाईटवॉश दिला आहे. या खेळात विराट कोहलीच्या इनिंगमुळे टीम इंडियाला एवढी मोठी धावसंख्या उभी करता आली. 

विराट कोहलीने (virat kohali) काल श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 110 चेंडूत 166 धावा काढल्या आहेत. त्याच्या एकुण खेळीत 13 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 150.91 होता. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शकते झळकाली. विराटच्या या खेळीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

विराट कोहलीची गणना जगातील धोकादायक फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आपल्या बळावर टीम इंडियाला (team India) अनेक सामने जिंकून दिलेत. जेव्हा तो क्रीझवर असतो तेव्हा टीम इंडियाचा विजय सुनिश्चित असतो.

वाचा: गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोलचे आजचे दर  

विराट कोहलीच्या रेकॉर्डची यादी

  1. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील 46 वे अर्धशतक झळकावले. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरला आहे. तर याआधी सचिन तेंडुलकर 49 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
  2. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 वेळा 150 धावांचा टप्पा पार करणारा विराट पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यामध्ये रोहित शर्मा हा ओपनर म्हणून 8 वेळा अशी कामगिरी करणारा नंबर वन भारतीय फलंदाज आहे.
  3. विराट कोहलीने काल (15 जानेवारी 2023) चौथे शतक झळकले असून यापूर्वी 15 जानेवारी 2017 रोजी त्याने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 122 धावा, 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत 153 धावा आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 104 धावा केल्या होत्या. आता 2023 मध्ये पुन्हा एकदा 15 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध त्याने 166 धावांची नाबाद खेळी खेळला आहे.
  4. विराट कोहलीने भारतात खेळताना सर्वाधिक 22 शतके झळकावली आहेत. गुवाहाटी येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 21 वे होम शतक झळकावले असून यामध्ये मास्टर बास्टर सचिन तेंडुलकरचा पराभव केला आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत भारतात एकूण 20 शतके झळकावली होती.
  5. श्रीलंकेविरुद्ध खेळताना विराट कोहलीने सर्वाधिक 10 शतके झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 9 शतके झळकावली होती.
  6. या शतकासह विराटने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धनेला मागे टाकले आहे. कोहलीने वनडेमध्ये 12754 धावा केल्या आहेत. तर महेला जयवर्धनेने एकदिवसीय कारकिर्दीत एकूण 12650 धावा केल्या.
  7. सध्याच्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके आहेत. कोहलीने एकूण 74 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. यामध्ये डेव्हिड वॉर्नर 45 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  8. आज श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने कारकिर्दीतील 74 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.
  9. श्रीलंकेविरुद्धच्या या शतकात विराट कोहलीने वनडेच्या एका डावात सर्वाधिक षटकार ठोकले. या खेळीत त्याच्या बॅटमधून एकूण 8 षटकार निघाले.
  10. विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरी उच्च धावसंख्या केली. या सामन्यात त्याने 166 धावांची नाबाद खेळी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 183 धावा आहे.