AUS vs SA: चीते की चाल, बास की नजर आणि लाबुशेनचा कॅच... थक्क करणारा Video पाहाच!

Boxing Day Test, AUS vs SA: ऑस्ट्रेलियन संघ तसा तगडा... फिल्डिंगच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा हात धरू शकत नाही. अनेक दिग्गजांच्या यादीत नाव येतं ते मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) यांचं... 

Updated: Dec 26, 2022, 06:03 PM IST
AUS vs SA: चीते की चाल, बास की नजर आणि लाबुशेनचा कॅच... थक्क करणारा Video पाहाच! title=
AUS vs SA, Marnus Labuschagne

AUS vs SA 2nd Test: दरवर्षी 26 डिसेंबरला खेळला जाणाऱ्या 'बॉक्सिंग डे टेस्ट' सामन्याला (Boxing Day Test) आज सुरूवात झाली. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ अफ्रिकेमध्ये (AUS vs SA) खेळली जात असलेल्या तीन सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना (AUS vs SA 2nd Test) आजपासून मेलबर्नच्या मैदानावर (Melbourne Cricket Ground) खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी साऊथ अफ्रिकन फलंदाजांच्या दांड्या गुल्ल केल्या. त्यामुळे आता साऊथ अफ्रिका संघ अडचणीत सापडल्याचं पहायला मिळतंय. (marnus labuschagne takes amazing catch on mitchell starc ball khaya zondo out in aus vs sa 2nd test watch video marathi news)

ऑस्ट्रेलियन संघ तसा तगडा... फिल्डिंगच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा हात धरू शकत नाही, असा ऑस्ट्रेलियन संघाचा इतिहास राहिलाय. अनेक दिग्गजांच्या यादीत नाव येतं ते मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) यांचं... कधी पॉईंट तर कधी लाँग ऑनवर असणाऱ्या लाबुशेनती नजर अगदी तगडी. याच लाबुशेनचा (Marnus Labuschagne Video) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा - Ind vs Ban : 'मला पश्चाताप होत नाहीये...', कुलदीप यादवला ड्रॉप केल्यावर KL Rahul ने सोडलं मौन!

सामन्यातच्या 28 व्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) चेंडूवर झोंडोने शानदार कव्हर ड्राईव्ह (Cover Drive) मारला तेव्हा चेंडू वेगाने जात होता, त्याचवेळी लाबुशेनने चित्ताकडे उडी मारली आणि एका हाताने त्याचा झेल घेतला. त्याचा कॅच पाहून सर्वजण (Marnus Labuschagne takes amazing catch) आवाक झाले. त्यावेळी झोंडो फक्त 5 धावांवर खेळत (khaya zondo out) होता. त्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

पाहा Video -

दरम्यान, सामन्याच्या 28 व्या ओव्हरपर्यंत साऊथ अफ्रिकेची अर्धी टीम तंबूत परतली होती. कॅमरून ग्रीनच्या (Cameron Green) भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन संघ टिकू शकला नाही. ग्रीनने रेड सिग्नल देत साऊथ अफ्रिकेच्या 5 फलंदाजांना तंबूत पाठवलं. तर स्टार्कने 2 फलंदाजांना घरी पाठवत साऊथ अफ्रिकेची कंबर तोडली. स्टार्कच्या (Mitchell Starc) दोन विकेटने बावुमा (Temba Bavuma) आणि झोंडोला (Khaya Zondo) बाद केलं आणि ऑस्ट्रेलियाचे सुगीचे दिवस सुरू झाले.