चाहते 'विराट-विराट' ओरडत होते, तेवढ्यात Anushka चा व्हिडीओ कॉल आला, Virat ने असं काही केलं की...

विराट आणि अनुष्काचा व्हिडिओ कॉल व्हायरल

Updated: Sep 29, 2022, 05:57 PM IST
चाहते 'विराट-विराट' ओरडत होते, तेवढ्यात Anushka चा व्हिडीओ कॉल आला, Virat ने असं काही केलं की... title=

Virat Anushka: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (india vs south africa) पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. T20 World Cup पूर्वी खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या टी-20 मालिकेत धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि दीपक चहर  (Deepak Chahar) या जोडीच्या धोकादायक स्विंगने ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर कहर केला. दक्षिण आफ्रिकेने अवघ्या नऊ धावांत त्यांचे पाच विकेट गमावल्या. त्यानंतर भारताने सहज सामना खिश्यात घातला. (india vs south africa virat kohli busy on call with anushka sharma shows it to fans watch video)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाने तीन सामन्यांच्या T20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Team India Video Viral) होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि टीम बस दिसत आहे. सामना संपल्यानंतर क्रिकेटर्स त्यांच्या खासगी आयुष्यात व्यस्थ होतात. भारतीय संघ बसमध्ये असताना विराटला अनुष्काचा व्हिडीओ (Virat Anushka Video Call) कॉल आला.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर, टीम इंडियाला मोठा झटका

बसच्या बाहेर चाहते विराटची वाट पाहत होते. त्याचवेळी विराट अनुष्कासोबत बोलण्यात गुंतला होता (virat kohli busy on call with anushka). चाहते विराट विराट ओरडत होते, तेवढ्यात विराटने चाहत्यांना खुश करण्यासाठी अनुष्कासोबतचा व्हिडीओ कॉल चाहत्यांना दाखवला. त्यानंतर चाहते देखील खुश झाले. दरम्यान, कोहलीने बसमधून चाहत्यांसमोर आपल्या फोनची स्क्रीन दाखवली, ज्यामध्ये अनुष्का शर्मा दिसत आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला आणि अभिनेत्याला पाहून चाहते (fans) खूप खूश झाले.

पाहा व्हिडीओ-  

दरम्यान, पहिल्या सामन्यात विराट कोहलीला (virat kohli) नावाला साजेसा खेळ करता आला नाही.  त्याचबरोबर रोहितला देखील खास खेळी करता आली नाही. त्यामुळे आता 2 ऑक्टोबरला खेळल्या जाणाऱ्या आगामी टी-ट्वेंटी सामन्यात विराटकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.