दक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया इतिहास बदलणार?

टीम इंडियाच्या आफ्रिकन चॅलेंजला केपटाऊन टेस्टनं सुरुवात होतेय. दक्षिण आफ्रिकेत भारतीय टीम गेल्या २५ वर्षात एकही टेस्ट सीरिज जिंकू शकलेली नाही. त्यामुळे हा इतिहास बदलण्याचं मोठ आव्हान कोहली अँड कंपनीसमोर असेल. फाफ ड्यूप्लेसिसच्या तेज तर्रार बॉलर्सचा सामनाही टीम इंडियाच्या बॅट्समनना करावा लागेलं. 

Updated: Jan 5, 2018, 11:17 AM IST
दक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया इतिहास बदलणार? title=

केपटाऊन : टीम इंडियाच्या आफ्रिकन चॅलेंजला केपटाऊन टेस्टनं सुरुवात होतेय. दक्षिण आफ्रिकेत भारतीय टीम गेल्या २५ वर्षात एकही टेस्ट सीरिज जिंकू शकलेली नाही. त्यामुळे हा इतिहास बदलण्याचं मोठ आव्हान कोहली अँड कंपनीसमोर असेल. फाफ ड्यूप्लेसिसच्या तेज तर्रार बॉलर्सचा सामनाही टीम इंडियाच्या बॅट्समनना करावा लागेलं. 

भारताचा दक्षिण आफ्रिकेन दौरा हा कायम ऐतिहासिक आणि मिस्ट्रियस असाच असतो. आता कोहलीच्या टीमला आफ्रिकेतील २५ वर्षांचा टेस्ट सीरिज पराभवाचा इतिहास बदलायचाय. २०१७ मध्ये टीम इंडियाची कामगिरी स्वप्नवत वाटावी अशीच झाली होती. आता २०१८ क्रिकेटच्या सीझनची सुरुवात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानं सुरु होते. या दौऱ्यात भारतीय टीमच्या क्लास आणि कॅरेक्टरची कसोटी लागेल. आफ्रिकेच्या फास्ट पिचवर कोहली अॅन्ड कंपनीच्या बॅट्समनची अग्निपरीक्षा असेल. 

दक्षिण आफ्रिकेत सध्या पाणी टंचाईची समस्या आहे. यामुळे न्यूलँड्सच्या पिचवर पाणी कमी टाकलं जातंय... आणि याचा फायदा भारतीय टीमला होण्याची शक्यता आहे. मात्र, आफ्रिकन टीमच्या पेस बॅट्रीसमोर भारतीय बॅट्समनचा कस लागणार आहे.

दरम्यान, कोहलीसमोर टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी द्यायची? हा यक्ष प्रश्न असेल. त्यातच रविंद्र जाडेजाच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे स्पिन बॉलिंगची मदार ही अश्विनवर असेल. 

भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट सीरिज जिंकू  शकलेली नाही. त्यामुळे आता टीम इंडिया हा इतिसहा बदलण्यास आतूर असेल. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नव्या क्रिकेट सीझनची सुरुवात विजयानं करते का याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल.