IND Vs SA T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानात घुसला साप, पळापळ झाल्याचा Video Viral

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत भारताला पहिल्यांदा फलंदाजीचं आव्हान दिलं. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली.

Updated: Oct 2, 2022, 07:53 PM IST
IND Vs SA T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानात घुसला साप, पळापळ झाल्याचा Video Viral title=
Photo: Twitter

India Vs South Africa T20 Match Snake Enter In Ground: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत भारताला पहिल्यांदा फलंदाजीचं आव्हान दिलं. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. पण सात षटकांचा सामना संपताच मैदानात एक पळापळ सुरु झाली. प्रेक्षकांना नेमकं कळलंच नाही मैदानात इतकी पळापळ का सुरु आहे. आठवं षटकं सुरु होण्यापूर्वी सामना थांबवला होता. त्यामुळे प्रेक्षकांची कुजबूज सुरु झाली आणि कॅमेरामननं मैदानातील सापाकडे लक्ष वेधलं. साप पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर सापाल पकडताच सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. 

साप मैदानात आल्याचं पाहून सपोर्ट स्टाफ तिथे पोहोचला आणि सापाला पकडून बाहेर नेलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. 

दोन्ही संघ-
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंग

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी