टीम इंडियाला मालिका विजयाची संधी, तर दक्षिण आफ्रिकेसाठी 'करो या मरो'चा सामना

IND vs SA 2nd T20: दक्षिण आफ्रिकेने जिंकला टॉस

Updated: Oct 2, 2022, 06:59 PM IST
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी, तर दक्षिण आफ्रिकेसाठी 'करो या मरो'चा सामना title=

IND vs SA 2nd T20: आगामी T20 World Cup पुर्वी भारत आणि साऊथ अफ्रिकेमध्ये दुसरा टी 20 सामना खेळला जात आहे. गुवाहटीच्या मैदानावर हा सामना खेळला जाईल. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने साऊथ अफ्रिकेचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर आता दुसरा सामना जिंकून मालिका खिश्यात घालण्याचा प्रयत्न भारताचा असेल.

दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात साऊथ अफ्रिकेने टॉस जिंकला असून त्यांनी प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पीच पाहता पहिल्या डावात 180 धावांची अपेक्षा क्रिकेट तज्ज्ञांनी केली आहे.

दोन्ही संघ-

भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंग

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी