IND vs PAK: 'भारतीय संघाची परिस्थिती पाहता...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूनं टीम इंडियाला डिवचलं

टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने गेल्या वर्षीच्या T20 वर्ल्ड कपपासून आतापर्यंत 8 मालिका जिंकल्या आहेत. आता टी 20 वर्ल्डकप सामन्यांना सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात मोठा उलटफेर दिसून आला. ग्रुप स्टेज सामन्यात नामिबियाने श्रीलंकेला 55 धावांनी पराभूत केलं. दुसरीकडे क्रीडाप्रेमी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Updated: Oct 16, 2022, 04:48 PM IST
IND vs PAK: 'भारतीय संघाची परिस्थिती पाहता...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूनं टीम इंडियाला डिवचलं title=

India vs Pakistan T20 World Cup 2022: टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने गेल्या वर्षीच्या T20 वर्ल्ड कपपासून आतापर्यंत 8 मालिका जिंकल्या आहेत. आता टी 20 वर्ल्डकप सामन्यांना सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात मोठा उलटफेर दिसून आला. ग्रुप स्टेज सामन्यात नामिबियाने श्रीलंकेला 55 धावांनी पराभूत केलं. दुसरीकडे क्रीडाप्रेमी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. हा सामना 23 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. आजी माजी खेळाडू दोन्ही संघांना डिवचण्याचा प्रयत्न करतात. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आकिब जावेदनं टीम इंडियाबाबत आग ओकली आहे. 

'टीम इंडिया सध्या चांगल्या फॉर्मात नाही. फलंदाज धावांसाठी झुंजत आहेत.  बुमराह नसल्याने गोलंदाजीला तशी धार नाही. तर शाहीनचे आणि हॅरिस रौफचे प्रभावी गोलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजांवर दबाव असेल. भारतीय गोलंदाज सामान्य मध्यम गतीने गोलंदाजी करतात. पण हार्दिक पांड्या असा खेळाडू आहे जो कधीही खेळ बदलू शकतो.', असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आकिब जावेद बोलला.

T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वी ICC ने 4 भारतीय खेळाडूंना केलं बाहेर, प्लेईंग 11 मध्ये 'या' खेळाडूंना स्थान

2021 च्याT20 विश्वचषकात टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्सनी पराभव सहन करावा लागला होता. यानंतर भारतीय संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारताकडे अनेक स्टार खेळाडू असून विजेतेपद मिळवून देऊ शकतात. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये एकमेव विजेतेपद पटकावले होते.