भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

इंग्लंडच्या दौऱ्यावर असतानाच भारताच्या न्यूझीलंडच्या दौऱ्याची घोषणा झाली आहे.

Updated: Aug 1, 2018, 05:58 PM IST
भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर title=

वेलिंग्टन : इंग्लंडच्या दौऱ्यावर असतानाच भारताच्या न्यूझीलंडच्या दौऱ्याची घोषणा झाली आहे. जानेवारी २०१९ पासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा दौरा संपल्यानंतर भारत लगेचच न्यूझीलंडला रवाना होईल. न्यूझीलंडच्या या दौऱ्यामध्ये ५ वनडे आणि ३ टी-२०चा समावेश आहे. पुरुषांच्या मॅचबरोबरच महिलाही न्यूझीलंडला जाणार आहेत. महिला टीम न्यूझीलंडमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० मॅचही खेळणार आहे.

भारतीय पुरुष टीमचं वेळापत्रक

२३ जानेवारी- पहिली वनडे, नेपियर

२६ जानेवारी- दुसरी वनडे- माऊंट मोनुनगाई

३१ जानेवारी- चौथी वनडे- हॅमिल्टन

३ फेब्रुवारी- पाचवी वनडे- वेलिंग्टन

६ फेब्रुवारी- पहिली टी-२०- वेलिंग्टन

८ फेब्रुवारी- दुसरी टी-२०- ऑकलंड

१० फेब्रुवारी- तिसरी टी-२०- हॅमिल्टन