VIDEO: मैदानात पहायला मिळालं विराट-रोहितमधील मित्रप्रेम

विराट आणि रोहित यांच्यात 'ब्रोमान्स' पहायला मिळाला

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 30, 2017, 08:21 AM IST
VIDEO: मैदानात पहायला मिळालं विराट-रोहितमधील मित्रप्रेम  title=
Image: Screen Grab

नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि कॅप्टन विराट कोहली यांनी केलेल्या सेंच्युरीच्या जोरावर टीम इंडियाने वन-डे मॅच जिंकत सीरिजही आपल्या नावावर केली. रविवारी झालेल्या या मॅच दरम्यान विराट आणि रोहित यांच्यात 'ब्रोमान्स' पहायला मिळाला.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर ३३८ रन्सचं आव्हान दिलं. या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी २३० रन्सची पार्टनरशीप केली. या मॅचमध्ये रोहित आणि विराट यांनी आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड्स केले.

रविवारी झालेल्या मॅचमध्ये विराट कोहलीने आपल्या वन-डे क्रिकेटमध्ये ९ हजार रन्स पूर्ण केले. कोहलीने आपल्या इनिंगमध्ये १०६ बॉल्समध्ये फोर आणि सिक्सर लगावत ११३ रन्स केले. तर, रोहित शर्माने या मैदानात आपली दुसरी सेंच्युरी लगावली. यापूर्वी २०१५ मध्ये दक्षिण अफ्रिका विरोधात खेळलेल्या मॅचमध्ये सेंच्युरी केली होती.

रोहित आणि विराटने आपल्या सेंच्युरी नंतर एकमेकांची गळाभेट घेत अभिनंदन केलं. मैदानात दोन्ही बॅट्समनचं 'ब्रोमान्स' यावेळी प्रेक्षकांना पहायला मिळालं. बीसीसीआयने स्लो मोशन असलेला एक व्हिडिओ आपल्या टीव्हीवर पोस्ट करत त्याला 'ब्रोमान्स' असं म्हटलं आहे.

पुण्यात झालेल्या दुसऱ्या वन-डे मॅचनंतरही बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओत कॅप्टन विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात ब्रोमान्स पहायला मिळाला होता.