वेलिंग्टन : न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंड संघाला विजयासाठी २५३ धावांचे आव्हान दिले आहे. नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारतीय फलंदाजांना योग्य ठरवता आला नाही. भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताने पहिले चार विकेट अवघ्या १८ धावांवर गमावले. ज्यानंतर संघाच्या मधल्या फळीने चांगला खेळ केला. अंबाती रायडुने सर्वाधिक ९०, केदार जाधवने ३४ तर हार्दिक पांड्याने ४५ धावांची वेगवान खेळी केली.
पाचव्या सामन्याला सुरुवात झाल्यानंतर ८ धावांवरच भारताने पहिला गडी गमावला. कर्णधार रोहित शर्मा केवळ २ धावा करुन बाद झाला. त्यापाठोपाठ शिखर धवन ६ धावा करुन बाद झाला. भारताचे सलामीवीर विशेष कामगिरी न करता माघारी गेल्यामुळे संघाला हा एक धक्काच होता. धवन बाद झाल्यानंतर नवखा शुभमन गिलदेखील ७ धावांवर तंबूत परतला. त्याच्यानंतर सर्वांच्याच नजरा मैदानात आलेल्या धोनीकडे लागल्या होत्या. गेल्या अनेक सामन्यांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या धोनीला या सामन्यात मात्र चांगली कामगिरी करण्यास अपयश आलं. धोनी बोल्टच्या गोलंदाजीवर अवघी १ धाव करुन त्रिफळाचीत झाला. यानंतर आलेल्या विजय शंकर आणि अंबाती रायडुच्या जोडीने भारताचा डाव सावरला. या दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी नाबाद ५० धावांची भागीदारी झाली असून, ही धावसंख्या वाढत आहे. या दोघांच्या भागीदारीने भारतीय खेळीचा पाया रचला. पाचव्या एकदिवसीय सान्यात न्यूझीलंडकडून सर्वाधिक गडी बाद करत मॅट हेन्री याने भारतीय फलंदाजांना काही प्रमाणात रोखलं.
Innings Break!
A 22 ball 45 run cameo from @hardikpandya7 propels #TeamIndia to a total of 252 runs. Will the bowlers defend this total in the 5th and final ODI?
Scorecard - https://t.co/4yl5MxOATC #NZvIND pic.twitter.com/EQLuVjMraw
— BCCI (@BCCI) February 3, 2019
Rayudu and Vijay Shankar steady the scoreboard for #TeamIndia. Bring up a 50-run partnership.
India - 68/4
Live - https://t.co/4yl5MxOATC #NZvIND pic.twitter.com/zjV5Ax4HGp
— BCCI (@BCCI) February 3, 2019
5th ODI. India win the toss and elect to bat https://t.co/4yl5Mxx024 #NZvInd
— BCCI (@BCCI) February 3, 2019
Three changes to our Playing XI in this game #NZvIND pic.twitter.com/mVDw4NN9qe
— BCCI (@BCCI) February 3, 2019
यानंतर आलेल्या विजय शंकर आणि अंबाती रायडूने भारताचा डाव सावरला. या दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी झाली. या दोघांच्या भागीदारीने भारतीय खेळीचा पाया रचला. भारताचा पाचवा विकेट ११६ धावांवर गेला. विजय शंकर ४५ धावा करुन रनआऊट झाला. यानंतर आलेल्या केदार जाधवने चांगली खेळी करत रायडुला उत्तम साथ दिली. सहाव्या विकेटसाठी रायडू-जाधव यांच्यात ७४ धावांची भागीदारी झाली. भारताची धावसंख्या १९० असताना रायडू बाद झाला. त्याने ९० धावांची खेळी केली. यानंतर काही वेळाने केदार जाधव देखील बाद झाला. त्याने ३४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने धमाकेदार खेळी केली. पांड्याने २२ बॉलमध्ये ४५ धावांची विस्फोटक खेळी केली. यात त्याने ५ सिक्स तर २ चोकार लगाले. पांड्याच्या या खेळीमुळे न्यूझीलंडला २५३ धावांचे आव्हान देता आले.
न्यूझीलंडकडून सर्वाधिक ४ विकेट मॅट हेन्री याने घेतल्या. तर ट्रेंट बोल्टने ३ आणि जेम्स निशानने १ विकेट घेतला.