नवी दिल्ली : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या मॅच दरम्यान महेंद्रसिंग धोनी याने स्वतःची विकेट ज्या प्रकारे वाचवली तो क्षण पाहिल्यानंतर सर्वांनीच माहीचं कौतुक केलं.
राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाची कामगिरी काही खास पहायला मिळाली नाही. मात्र, असं असलं तरी टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्रसिंग धोनी याने असं काही केलं की तो सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.
झालं असं की, धोनी मैदानात बॅटिंगसाठी उतरला त्यानंतर १६व्या ओव्हरमध्ये धोनी स्टंप आऊट होता होता वाचला. या ओव्हरमध्ये धोनीने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याला यश आलं नाही. आणि बॉल न्यूझीलंडच्या विकेटकीपरच्या हातात गेला.
न्यूझीलंडच्या विकेटकीपर स्टम्पिंग करणार तेवढ्यात धोनीने स्ट्रेचिंग करत स्वत:ची विकेट वाचवली. यानंतर अंपायरने निर्णय थर्ड अंपायरच्या कोर्टात टाकला. मग, थर्ड अंपायरने निर्णय देत धोनी नॉट आऊट असल्याचं जाहीर केलं. तुम्हीही पाहा हा व्हिडिओ...
तीन टी-२० मॅचेसच्या सीरिजमधील दिल्लीत खेळलेली पहिली मॅच टीम इंडियाने जिंकली. तर, राजकोटमध्ये झालेली दुसरी मॅच न्यूझीलंडने जिंकली त्यामुळे सीरिजमध्ये दोन्ही टीम्सने १-१ ने बरोबरी केली आहे.