हार्दिक पांड्याने अखेर विराटचा बदला घेतला

टीम इंडियात एक अनोखी परंपरा सुरू झाली आहे, ज्याचा वाढदिवस असेल त्याला केकने रंगवून टाकणे. ही परंपरा कॅप्टनवरही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 5, 2017, 12:30 PM IST
हार्दिक पांड्याने अखेर विराटचा बदला घेतला title=

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा हा वाढदिवस आहे, ५ नोव्हेंबर २०१७ म्हणजे आजच्या दिवशीच तो आपला २९ वा वाढदिवस साजरा करीत आहे. न्यूझीलंड विरूद्ध दुसऱ्या टी २० क्रिकेट सामन्यात पराभव झाल्यानंतर, टीम इंडियाच्या खेळाडूंनी कॅप्टनचा जोरदार वाढदिवस साजरा केला.

टीम इंडियात एक अनोखी परंपरा

टीम इंडियात एक अनोखी परंपरा सुरू झाली आहे, ज्याचा वाढदिवस असेल त्याला केकने रंगवून टाकणे. ही परंपरा कॅप्टनवरही चांगलीच लागू पडली आहे. सर्वात आधी विराट कोहलीच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला, त्याच केकने विराट कोहलीला त्याच्या साथीदारांना रंगवलं.

पांड्यालाही चांगलंच रंगवलं होतं

विराट कोहलीने देखील हार्दिक पांड्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पांड्याला चांगलंच रंगवलं होतं, याचा बदला घेण्याची संधी हार्दिक पांड्याने आज सोडली नाही. हार्दिक पांड्याला याचा बदला आख्या टीमकडून घ्यायचा आहे, मात्र विराट ही केकने तोंड रंगवण्याच्या बाबतीत पहिली शिकार होती, ती पांड्याने केली.

हार्दिक पांड्याने पहिली शिकार विराट

काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याचा वाढदिवस होता, तेव्हा टीम इंडियाच्या खेळाडूंनी हार्दिक पांड्याला चांगलंच केकने रंगवलं होतं, याचाच पहिला बदल विराटकडून हार्दिक पांड्याने घेत विराटला चांगलंच रंगवलं आहे.