धोनीच्या फिल्डिंगचा व्हिडिओ होतोय व्हायरल

 या कॅच वर विकेट मिळाली नसली तरी प्रेक्षकांना या कॅचचे कौतूक केले. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 23, 2017, 11:00 AM IST
धोनीच्या फिल्डिंगचा व्हिडिओ होतोय व्हायरल title=

नवी दिल्ली : भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी वयाच्या ३६ व्या वर्षातही किती फिट अॅण्ड फाइन असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदाा आला आहे.  त्याने घेतलेल्या या कॅच वर विकेट मिळाली नसली तरी प्रेक्षकांना या कॅचचे कौतूक केले. 

मॅचच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमार बॉलिग करत होता. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल कोलिन मुनरो याने ऑफ साईडला विकेटच्यामागे टोलावला. पण तिथे आधीपासूनच तयारीत असलेल्या धोनीने झेप घेत बॉल पकडला. भुवनेश्वर कुमारला काही वेळ वाटले हा विकेट आहे पण धोनीने अपील करण्यास नकार दिला.

धोनी त्याच्या फिटनेसमूळे आजही आपले भक्कम स्थान टिकवून आहे. त्यामूळे दिनेश कार्तिकला अजूनही विकेट किपिंग मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.