IND vs NZ: प्रेमाची नवी 'हाईट' भर सामन्यात वातावरण 'टाईट', तरूणानं केलं Rooftop वर प्रपोज!

India vs New zealand 1st ODI: सामन्यात दोन्ही संघांनी आपापलं प्रदर्शन दाखवलंत प्रेक्षकांचं मन जिंकलं. मात्र, दुसरीकडे ईडन गार्डनच्या गच्चीवर (Eden Park Rooftop) काही वेगळंच दृष्य पाहायला मिळालं.

Updated: Nov 25, 2022, 05:14 PM IST
IND vs NZ: प्रेमाची नवी 'हाईट' भर सामन्यात वातावरण 'टाईट', तरूणानं केलं Rooftop वर प्रपोज! title=
Eden Park Love Proposal On Rooftop India Vs New zealand

Eden Park Love Proposal On Rooftop India Vs New zealand: न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या यंगिस्तानने टी-ट्वेंटी मालिका (IND vs NZ T20) खिश्यात घातली. त्यानंतर आता टीम इंडियाचं लक्ष वनडे सिरीजवर (IND vs NZ 1st ODI) आहे. मात्र, पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागलाय. केन आणि लिथम जोडीने भारतीय गोलंदाजांची धु धु धुलाई केल्यानं पहिला सामना भारताने 7 विकेटने गमावला. मात्र, या सामन्यात प्रेमाची एक नवी झलक पहायला मिळाली. (india vs new zealand 1st odi match love couple proposal on eden park stadium rooftop)

सामन्यात दोन्ही संघांनी आपापलं प्रदर्शन दाखवलंत प्रेक्षकांचं मन जिंकलं. मात्र, दुसरीकडे ईडन गार्डनच्या गच्चीवर (Eden Park Rooftop) काही वेगळंच दृष्य पाहायला मिळालं. हे दृश्य पाहून क्षणभर सर्वजण दोन्ही संघाचे खेळाडू सामना देखील विसरले. एक जोडपं Auckland च्या Eden Park च्या मैदानाच्या छतावर चढले. सर्व तयारीनिशी या जोडप्यांनी परवानगी घेऊन हा प्रयोग केला.

आणखी वाचा - IND vs NZ: ऋषभ पंत की संजू सॅमसन? शिखर धवन न्युझीलंडविरूद्ध कोणाला संधी देणार?

एक प्रेमी युगल ईडन (Couple proposal on eden park) गार्डनच्या छतावर चढले. त्यानंतर प्रियकरानं आपल्या प्रेयसीला (Eden Park Love Proposal) प्रपोज केलं. हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकदा प्रेमी जोडप्यांना भर स्टेडियममध्ये प्रपोज करताना पाहतो. मात्र, या जोडप्यांची इच्छाच वेगळी. तरुणाने तरुणीला छतावर नेऊन प्रपोज केला.

पाहा फोटो - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Eden Park (@edenparknz)

दरम्यान, दोघांनी यावेळी सनलाईट गॉगल देखील घातले होते. ईडन पार्कने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून (edenparknz) काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये कपल एकमेकांना प्रपोज (Couple Propose) करताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या न्यूझीलंडमध्ये या कपलची चर्चा होताना दिसत आहे. सध्या क्रिकेट मैदानावर येऊन प्रपोज करण्याचं नवं फ्याड मार्केटमध्ये आलंय. त्यामुळे अनेकजण प्रसिद्धीच्या झोतात देखील येतात.