ऋषभ पंतमुळे करिअर धोक्यात पण हार्दिक पांड्याने सावरलं

हार्दिक पांड्या की ऋषभ पंत तुम्हाला कोण कर्णधार म्हणून आवडला?

Updated: Jun 27, 2022, 03:40 PM IST
ऋषभ पंतमुळे करिअर धोक्यात पण हार्दिक पांड्याने सावरलं title=

मुंबई : हार्दिक पांड्याच्या हाती टीमची कमान आल्याने नव्या खेळाडूंना त्याने संधी दिली. दाखल झाला आहे. होय, हा खेळाडू आज टीम इंडियासाठी पदार्पण करत आहे. आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत तो दुसरा कोणी नसून घातक वेगवान गोलंदाज उमरान मलिक आहे. 

उमरान आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये निळ्या रंगाची जर्सी घालून पहिला सामना खेळणार आहे. याआधी त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही निवड झाली होती, मात्र ऋषभ पंतने त्याला संपूर्ण मालिकेच्या टीममधून बाहेर ठेवलं होतं.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांच्या सीरिजमध्ये त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही. बेंचवर बसवून खेळाडूचं करिअर धोक्यात आणण्याचं काम पंत करत होता. त्याला संधी का दिली नाही हा प्रश्न सोशल मीडियावर दिग्गज आणि क्रिकेटप्रेमींनीही विचारला.

हार्दिक पांड्याने उमरानला पहिल्याच सामन्यात संधी दिली. 12 ओव्हर्समध्ये 1 ओव्हर टाकण्याची का होईना त्याला खेळण्याची संधी हार्दिकने दिली. हार्दिकनं त्याच्या बॉलिंगचं कौतुकही केलं. 

उमरान मलिकने आयपीएलमध्ये तुफान कामगिरी केली होती. 150 किमी ताशी वेगाने बॉल टाकणारा मलिक हैदराबादकडून खेळत होता. त्याने 14 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याने चार आणि एकदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. उमरानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरिजमध्ये संघात घेतलं मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली नाही

टी 20 साठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन
ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार) दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल आणि उमरान मलिक.