मुंबई : आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड ओपनिंगला उतरला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. यावर हार्दिक पांड्याने स्पष्टीकरण दिलं आहे. ऋतुराज गायकवाडला ओपनिंगसाठी का उतरवलं नाही याबाबत हार्दिक पांड्याने स्पष्टीकरण दिलं.
ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्याने त्याला ओपनिंगसाठी उतरवलं नाही. तो पूर्णपणे फिट नाही त्यामुळे त्याला ओपनिंगसाठी पाठवणं चुकीचं वाटलं असं हार्दिक पांड्या म्हणाला. त्यामुळे ओपनिंगसाठी दीपक हुड्डा मैदानात उतरला.
भारत विरुद्ध आयर्लंड पहिला टी 20 सामना पावसामुळे 12 ओव्हर्सचा खेळवण्यात आला. पहिल्यांदा बॅटिंग करत आयर्लंडने 12 ओव्हरमध्ये 4 गडी गमावून 108 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने लक्ष्याचा पाठलाग करत तीन गडी गमावून समाना जिंकला. टीममध्ये ओपनिंगसाठी ईशान किशन आणि गायकवाड ऐवजी दीपक हुड्डा मैदानात उतरला.
दीपक हुड्डाला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याने चांगली खेळी केली. 29 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 षटकार ठोकत 47 धावा केल्या. टीम इंडियाने या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.
ऋतुराज गायकवाडला दुखापत होती. अशा परिस्थितीमध्ये त्याला ओपनिंगला पाठवणं योग्य वाटलं नाही, तो पूर्ण बरा होणं आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आम्हाला कोणतीही जोखीम उचलायची नव्हती. तो पूर्णपणे बरा होणं आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.