India vs Canada Match abandoned : फ्लोरिडा येथे खेळवला जाणारा भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात टॉस देखील होऊ शकला नाही आणि अंपायर्सने दोनदा मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता भारत आणि कॅनडा या दोन्ही संघाला 1-1 गुण मिळाला आहे. इकडे पावसामुळे सामना रद्द झाला अन् दुसरीकडे टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकणार, अशा चर्चा होऊ लागल्या आहेत. नेमकी भानगड काय? पावसामुळे टीम इंडिया वर्ल्ड कप कशी जिंकणार? असा सवाल नेटकरी विचारत आहे. तर याचं उत्तर लपलंय 17 वर्षांपूर्वीच्या एका सामन्यामध्ये... नेमकं प्रकरण पाहुया...
कॅनडाविरुद्धचा सामना रद्द होणं टीम इंडियासाठी शुभसंकेत मानले जातायेत. कारण जेव्हा एखादा सामना रद्द होतो आणि भारत एक सामना ज्या वर्ल्ड कपमध्ये हरतो, तो वर्ल्ड कप भारताचा अशी समज सर्वांची आहे. 2007 मध्ये देखील असंच घडलं होतं. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि स्कॉटलँडची मॅच रद्द झाली होती. ही मॅच देखील पावसाने रद्द झाली होती. याच 2007 साली टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप उचलला होता. त्यामुळे आता टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकणार, अशी चर्चा होताना दिसतेय.
युवराज सिंग, गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, आर पी सिंग, रोहित शर्मा यांच्यासारखे युवा खेळाडू घेऊन टीम इंडिया धोनीच्या नेतृत्वात पहिल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये उतरली होती. त्यावेळी टीम इंडियाचा स्कॉटलँडविरुद्धचा पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांसारख्या मोठ्या संघांना पाणी पाजलं होतं. तर फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत वर्ल्ड कप जिंकला होता. अशातच आता टीम इंडियासाठी यंदाही पाऊस लकी ठरणार का? असा सवाल विचारला जात आहे.
दरम्यान, गेल्या 13 वर्षांपासून टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. टीम इंडियाने 2011 साली अखेरचा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर टीम इंडियामध्ये आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ पडला होता. अशातच आता टीम इंडिया यंदाच्या हा दुष्काळ संपवणार का? असा प्रश्न आहे. सध्या टीम इंडियाने सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. आता ऑस्ट्रेलिया सारख्या बड्या टीमला रोहित अँड कंपनीला पाणी पाजावं लागणार आहे.