'होय, बाबरची चूक झाली', जावयाची बाजू घेत Shahid Afridi कडून पाकड्यांना घरचा आहेर, म्हणतो...

Shahid Afridi angry on babar azam : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता पुन्हा अंतर्गत वादामुळे (Pakistan cricket team) चर्चेत आलंय. अशातच आता शाहिद आफ्रिदीने बाबर आझमवर निशाणा साधला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jun 15, 2024, 08:00 PM IST
'होय, बाबरची चूक झाली', जावयाची बाजू घेत Shahid Afridi कडून पाकड्यांना घरचा आहेर, म्हणतो... title=
Shahid Afridi angry on babar azam

Pakistan cricket team : पाकिस्तानचा संघ टी-ट्वेंटी विश्वचषक (T20 world cup 2024) मधून बाहेर पडला आहे. ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडल्याची नामुश्की पाकिस्तान संघावर आलीये. युएसएने पाकिस्तानचा पराभव केल्याने वर्ल्ड कपचं पारडं फिरलं अन् टीम इंडियाने पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवला. पाकिस्तानच्या पराभवानंतर आता क्रिडाविश्वातून पाकिस्तानी खेळाडूंवर टीका होत आहे. तर पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू देखील नाराज झाले आहेत. अशातच आता माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) देखील जावयाची बाजू मांडली अन् कॅप्टन बाबर आझमवर (babar azam) निशाणा साधलाय.

काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?

शाहिनला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपर्यंतच संघाचा कर्णधार करण्याचा निर्णय घेतला होता, हे बाबरला माहिती होतं ना.. मग त्याने वेळेआधी कॅप्टन्सी स्विकारण्यास नकार द्यायला हवा होता. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला बाबरच कॅप्टन झाला असता. पण त्याने शाहिनला सपोर्ट करायला हवा होता आणि कॅप्टन्सी स्विकारायला नको होती, असं शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे.

बाबरने शाहिनचं समर्थन करायला हवं होतं आणि कर्णधारपद नाकारायला हवं होतं. पण यात एकट्या बाबर आझमची चूक नाहीये. काही दोष निवड समितीलाही जातो, कारण काही सिलेक्टर्लला असा विश्वास होता की, लवकर बाबरला कॅप्टन केलं पाहिजे. पण बाबरने शाहिनच्या नेतृत्वाखाली खेळण्याची इच्छा व्यक्त केली असती तर संघासाठी हे चांगलं उदाहरण ठरलं असतं, असं शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे.

दरम्यान, शान मसूद आणि शाहीन शाह आफ्रिदीला कर्णधारपद सोपवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला, पाकिस्तानमध्ये झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये 3-0 अशी मात दिली होती, तर शाहीनच्या कॅप्टन्सीखाली न्यूझीलंडने पाकिस्तानला टी 20 सिरीजमध्ये 4-1 च्या फरकाने हरवले होते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज होतं. त्यानंतर बाबर आझमवर जबाबदारी देण्यात आली होती. 

पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सॅम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान शाह माझे.