Ind vs Aus T20 Trending : भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धची टी-20 मालिका (india vs australia 3rd t20 match) 2-1 ने खिशात घातली आहे. आजचा अंतिम सामना श्वास रोखून धरणारा होता, अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यामध्ये भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. तीन सामने पाहिले तर यामध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वात डोकेदुखी ठरणारा खेळाडू ठरला तो म्हणजे (Axar Patel) अक्षर पटेल. (india vs australia Trending axar patel won man of the series against australia)
भारताचा स्टार खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे बाहेर झाला होता. त्यामुळे जडेजाची जागा भरून कोण काढणार हा मोठा प्रश्न टीम इंडियाला पडला होता. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली. अक्षरनेही आपली निवड सार्थ ठरवली, त्याला 'प्लेअर ऑफ द सीरिज' (Player Of the Series India vs Austrelia) पुरस्काराने गौरवण्यात आलंय.
मालिकेमध्ये अक्षरची कामगिरी-
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताला पराभव पत्कारावा लागला होता. मोहालीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यामध्ये अक्षरने 17 रन्स देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये अक्षरने दोन ओव्हर टाकल्या होत्या, त्यावेळीही त्याने पॉवरप्लेमध्ये 13 रन्स देत मॅक्सवेल आणि टीम डेव्हिडला माघारी पाठवलं होतं. आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये 3 विकेट्स घेतल्या, कर्णधार फिंच, खतरनाक मॅथ्यू वेड आणि जोस इंगली यांना बाद केलं. त्यासोबतच एक अप्रतिम थ्रो ही केला त्यावर मॅक्सवेलला तंबूचा मार्ग दाखवला.
अक्षर पटेलने फिल्डिंगमध्येही नेत्रदीपक अशी कामगिरी केली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने अभ्यास हा फक्त रोहित (Rohit), विराट (Virat) आणि बुमराह (Bumrah) यांचा केला आणि पेपर हा अक्षर पटेलचा आला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. टीम इंडियाने 9 वर्षानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध (austrailia) टी20 मालिका जिंकली आहे.