चौथ्या वनडे मॅचमधील पराभवाने टीम इंडियाचे हे ४ स्वप्न भंगले

भारत आणि ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या पाच वनडे सामन्यांच्या सीरिजमधील चौथ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

Updated: Sep 29, 2017, 05:15 PM IST
चौथ्या वनडे मॅचमधील पराभवाने टीम इंडियाचे हे ४ स्वप्न भंगले title=

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या पाच वनडे सामन्यांच्या सीरिजमधील चौथ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

या पराभवामुळे लागोपाठ दहा सामन्यांमध्ये विजय मिळवण्याचा रेकॉर्ड करणे टीम इंडियासाठी स्वप्नच राहिला. यासोबतच आणखीही काही गोष्टी आपल्या नावावर करण्याची टीम इंडियाची संधी हुकली. 

नंबर १ वनडे टीम -

इंडोर वनडे सामन्यात विजय मिळाल्यानंतर टीम इंडिया वनडेत पहिल्या क्रमांकाची टीम झाली होती. पण बेंगळुरु येथील पराभवामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा दुस-या क्रमांकावर आली आहे. बेंगळुरूमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यावर पुन्हा एकदा साऊथ आफ्रिका टीम वनडेत पहिल्या क्रमांकावर आली. तसे तर टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका टीमचे अंक ११९-११९ असे सारखेच आहेत. पण काही फरकाने टीम इंडिया खाली आली आहे. 

लागोपाठ १० सामने जिंकण्याचं स्वप्न तुटलं-

कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने लागोपाठ ९ वनडे सामने जिंकले आहेत. जर बेंगळुरू येथील सामन्यात विजय झाला असता तर टीम इंडियाने लागोपाठ १० वनडे सामने जिंकण्याचा ऎतिहासिक कारनामा केला असता. विराटसाठी सुद्धा ही मोठी गोष्ट आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने लागोपाठ ९ वनडे सामने जिंकले. जर आणखी एक विजय मिळाला असता तर तो हा रेकॉर्ड करणार पहिला भारतीय कर्णधार ठरला असता. याआधी धोनी आणि सौरव गांगुली यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने ९-९ सामने जिंकले आहेत. 

क्लीन स्वीपचं स्वप्न भंगलं -

या पराभवासोबतच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या टीम विरूद्ध क्लीन स्वीपचीही संधी गमावली आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप करू शकला नाही. ज्याप्रकारे टीम इंडिया सीरिजचे पहिले तीन सामने जिंकले, ते पाहून असे वाटले   होते की, विराटच्या नेतृत्वात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप करेल. 

चिन्ना स्वामीमध्ये १३ वर्षांनी पराभव

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये टीम इंडियाला गेल्या १३ वर्षात पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने २००४ नंतर इथे ८ सामने खेळले, पण हा विजयीरथ ऑस्ट्रेलिया टीम रोखला.