Ind vs SL | वनडे सीरिजमध्ये सलामीला Shikharची साथ कोण देणार?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka Odi Series) यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 18 जुलैपासून  सुरुवात होत आहे.

Updated: Jul 17, 2021, 07:00 PM IST
Ind vs SL | वनडे सीरिजमध्ये सलामीला Shikharची साथ कोण देणार? title=

कोलंबो : कोरोनाच्या शिरकावानंतर अखेर 5 दिवसांच्या विलंबानंतर टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka Odi Series) यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला उद्यापासून (18 जुलै) सुरुवात होत आहे. नव्या दमाच्या शिलेदारांसह शिखर धवन (Shikhar Dhawan) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. संघात तोडीसतोड खेळाडू आहेत. त्यामुळे शिखरला सलामीला साथ कोण देणार, हा यक्ष प्रश्न टीम मॅनेजमेंटसमोर आवासून उभा आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण शिखरला साथ देण्यासाठी भारताकडे 3 पर्याय उपलब्ध आहेत. (india tour sri lanka who will be the come for opening with shikhar dhawan for odi series against sri lanka) 
  
शिखरला सलामीला साथ देण्यासाठी एकूण 3 दावेदार आहेत. यामध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) देवदत्त पडीक्कल (Devudtt Padikkal) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांचा समावेश आहेत. तिघांपैकी पृथ्वीचं नाव आघाडीवर आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. शिखर-पृथ्वी जोडी आयपीएलमध्ये दिल्लीसाठी सलामी करतात. आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यात या जोडीने धमाकेदार बॅटिंग केली. या दोघांमध्ये कमालीचा तालमेळ आहे. 

तसेच पृथ्वी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धमाकेदार फलंदाजी करतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पृथ्वीला संघातून वगळण्यात आलं होतं. मात्र  त्यानंतर पृथ्वीने स्वत:वर प्रचंड मेहनत घेतली. पृथ्वीने आपल्या नेतृत्वात विजय हजारे ट्रॉफीत मुंबईला विजय मिळवून दिला होता. वरील या 2 कारणांमुळे पृथ्वीचं नाव ऋतुराज गायकवाड आणि देवदत्तपेक्षा आघाडीवर आहे. 

ऋतुराज गायकवाड

मुळचा पुणेकर असलेला ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नईचे प्रतिनिधित्व करतो. गायकवाड आयपीएलच्या 13 व्या मोसमापासून सातत्याने धमाकेदार बॅटिंग करतोय. त्याच्या या खेळीच्या जोरावरच श्रीलंका दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. पृथ्वीचं नाव सर्वात चर्चेत असलं, तरी गायकवाडही प्रबळ दावेदार आहे. हे विसरुन चालणार नाही. त्यामुळे जर गायकवाडला संधी मिळाली तर त्याचे हे एकदिवसीय पदार्पण ठरेल. 

देवदत्त पडीक्कल

वनडे सीरिजमध्ये शिखरला देवदत्तही साथ देऊ शकतो. देवदत्तने आयपीएलमध्ये अगदी कमी काळात आपलं नाणं खणखणीत वाजवलंय. देवदत्त आयपीएलमध्ये बंगळुरुकडून सलामीला खेळतो. देवदत्तला तसा सलामीचा अनुभव आहे. देवदत्तला संधी मिळाल्यास त्याचं वनडे डेब्यू ठरेल. त्यामुळे या तिघांपैकी कोण बाजी मारून शिखरसोबत ओपनिंगला खेळणार, याबाबतचा खुलासा लवकरच होईल. 

पहिला सामना कधी आणि कुठे?

हा सामना डे नाईट असणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तसेच या मॅचचे आयोजन हे आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.