भारतीय बॉलरपुढे वेस्ट इंडिजची दाणादाण, भारताला हव्या ११० रन

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारतीय बॉलरनी शानदार कामगिरी केली आहे.

Updated: Nov 4, 2018, 08:45 PM IST
भारतीय बॉलरपुढे वेस्ट इंडिजची दाणादाण, भारताला हव्या ११० रन title=

कोलकाता : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारतीय बॉलरनी शानदार कामगिरी केली आहे. भारतीय बॉलरच्या अचूक माऱ्यामुळे वेस्ट इंडिजला २० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून फक्त १०९ रनच करता आल्या. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या कृणाल पांड्या आणि खलील अहमदला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. उमेश यादव आणि जसप्रीत बुमराहलाही १ विकेट घेण्यात यश मिळालं.

वेस्ट इंडिजकडून फॅबियन ऍलननं २० बॉलमध्ये सर्वाधिक २७ रन केले. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारतीय बॉलरनी रोहितचा हा निर्णय योग्य ठरवला आणि वेस्ट इंडिजला सुरुवातीपासूनच धक्के द्यायला सुरुवात केली.  

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा