भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, चार दशकांनंतर रचला मोठा इतिहास

असह्य वेदना सहन करून मागे फिरले नाहीत तर भारतीय खेळाडूंनी रचला इतिहास, सचिन, द्रविडही शाबासकी देतील अशी कामगिरी

Updated: May 14, 2022, 12:34 PM IST
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, चार दशकांनंतर रचला मोठा इतिहास title=

मुंबई : चार दशकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. टीम इंडियाला सर्वोत्तम खेळाडू मिळाले आहेत. ज्यांनी भारताच्या शिरपेचात पुन्हा एकदा गौरवास्पद कामगिरी करून मानाचा तुरा रोवला आहे. 

तब्बल 43 वर्षांनंतर भारतीय खेळाडूंनी थॉमस कपच्या फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. एच एस प्रणयने निर्णयाक समना खेळून सेमीफायनल सामना जिंकला. 

एच एस प्रणयने 3-2 ने सेमीफायनल सामना जिंकला आहे. 1979 नंतर भारताला कधीच सेमीफायनलपर्यंत पोहोचण्यात यश मिळालं नव्हतं. मात्र यावेळी 2016 चा चॅम्पियन ठरलेला डेनमार्कच्या खेळाडूला त्याने शह दिला. 

जागतिक चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता किदांबी श्रीकांत आणि जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकाची दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी भारताला अंतिम फेरीच्या शर्यतीत रोखले.

जागतिक क्रमवारीत 13 व्या क्रमांकावर असलेल्यारास्मस गेमके विरुद्ध कोर्टवर घसरल्यानंतर प्रणयलाही दुखापत झाली होती. पण 'वैद्यकीय टाइमआउट' घेतल्यानंतर भारतीय खेळाडूने आपला लढा सुरूच ठेवला. 

कोर्टवर त्याला वेदना होत होत्या पण या त्रासाला न जुमानता त्याने 13-21, 21-9 21-12 असा विजय मिळवून भारताचे नाव उज्जवल केलं. त्यांच्या कामगिरीचं जगभरात कौतुक होत आहे. त्यांच्या या कामगिरीला द्रविड आणि सचिन तेंडुलकरही शाबासकी देतील अशी कामगिरी आहे.