२६५ रन्सचा पाठलाग करताना भारताची खणखणीत सुरुवात

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये २६५ रन्सचा पाठलाग करताना भारतानं खणखणीत सुरुवात केली आहे. ११ ओव्हरमध्ये भारतानं एकही विकेट न गमावता ६७ रन्स बनवल्या आहेत. रोहित शर्मा हा नाबाद ३३ तर शिखर धवन नाबाद ३४ रन्सवर खेळत आहे.

Updated: Jun 15, 2017, 07:46 PM IST
२६५ रन्सचा पाठलाग करताना भारताची खणखणीत सुरुवात  title=

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये २६५ रन्सचा पाठलाग करताना भारतानं खणखणीत सुरुवात केली आहे. ११ ओव्हरमध्ये भारतानं एकही विकेट न गमावता ६७ रन्स बनवल्या आहेत. रोहित शर्मा हा नाबाद ३३ तर शिखर धवन नाबाद ३४ रन्सवर खेळत आहे.

या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि सुरुवातीलाच बांग्लादेशला दोन धक्के दिले. त्यानंतर मात्र तमीम इक्बाल आणि मुशफिकूर रहीम यांनी बांग्लादेशचा डाव सावरला.

तमीम आणि मुशफिकूरमध्ये तिसऱ्या विकेटसाठी तमीमनं मुशफिकूर रहीमबरोबर १२३ रन्सची पार्टनरशीप केली आणि बांग्लादेशचा डाव सावरला.  तमीम इक्बालनं ८२ बॉल्समध्ये ७० रन्सची खेळी केली. तर मुशफिकूर रहीमनं ८५ बॉल्समध्ये ६१ रन्स केल्या. कॅप्टन मशरफी मोर्तजानं शेवटी फटकेबाजी करून बांग्लादेशला २६४/७ पर्यंत पोहोचवलं. भारताकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि केदार जाधवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाला एक विकेट घेण्यात यश आलं.