IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्या वन डे आधी 'हा' स्टार खेळाडू बाहेर?

भारत आणि इंग्लंडदरम्यान उद्या पहिली वन डे खेळवली जाणार आहे, त्याआधी भारतीय संघासाठी वाईट बातमी

Updated: Jul 11, 2022, 09:48 PM IST
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्या वन डे आधी 'हा' स्टार खेळाडू बाहेर? title=

India vs England: कसोटी आणि टी-20 मालिकेनंतर आता भारत आणि इंग्लंडदरम्यान वन डे मालिका सुरु होतेय. तीन वन डे मालिकेतील पहिली वन डे उद्या खेळवली जाणार आहे. पण या सामन्याआधीच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. 

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत खेळू शकणार नसल्याची माहिती आहे. विराट कोहलीला तिसऱ्या T-20 दरम्यान मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे ओव्हल इथं इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहली खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

कोहलीची दुखापत किती गंभीर आहे याबाबत नेमकी माहिती देण्यात आलेली नाही. पण भारतीय संघ व्यवस्थापन कोहलीला पहिल्या सामन्यात विश्रांती देऊ शकते. जेणेकरून तो 14 जुलै आणि 17 जुलैला होणार्‍या पुढील दोन सामन्यांसाठी उपलब्ध असेल. बीसीसीआयच्या (BCCI) एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार गेल्या सामन्यात विराटच्या मांडीला दुखापत झाली होती. 

विराट कोहली टीम बसमधून नॉटिंगहॅमहून लंडनला आला नसल्याचं कळतंय. यामागे वैद्यकीय तपासणी हे कारण असू शकतं. याच कारणाने कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत विश्रांतीची मागणी केली असल्याचं कळतंय.

इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दोन सामन्यांमध्ये विराट कोहलीने 1 आणि 11 धावा केल्या. त्यामुळे विराट कोहलीलाही टी-20 फॉर्मेटमधून वगळण्याची चर्चा होऊ लागली आहे.