चहल गँगचा 'ऑफ फिल्ड डान्स' व्हायरल; पण, चेहरा झाकलेला तो कोण?

सर्वांनाच पडला प्रश्न.... 

Updated: Feb 3, 2020, 10:47 AM IST
चहल गँगचा 'ऑफ फिल्ड डान्स' व्हायरल; पण, चेहरा झाकलेला तो कोण?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : नुकतंच भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडच्या संघाला नमवत टी20 क्रिकेट मालिका खिशात टाकली. अतिश सुरेख आणि तितक्याच रोमहर्षक अशा सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी कमालीच्या खेळाचं प्रदर्शन केलं. नवोदितांपासून ते कसलेल्या खेळाडूंपर्यंत प्रत्येकानेच या सामन्यांत आपली छाप सोडली. 

मैदानावर भारतीय संघाने जितका कल्ला केला, तितकीच धमाल ते मैदानाबाहेरही करतानाह दिसत आहेत. परदेशवारीवर असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममधील घडामोडी अनेक कारणांनी आणि माध्यमांनी सर्वांना पाहायला मिळतात. त्यातच आता आणखी एक अफलातून व्हिडिओ, गोलंदाज युजवेंद्र चहल Yuzvendra Chahals याने पोस्ट केला आहे. युजवेंद्रने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याचा आणि संघातीत इतर खेळाडूंचा डान्स पाहायला मिळत आहे. 

Off field performance on point, कॅप्शन देत युजवेंद्रने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये शिवम दुबे, श्रेयस अय्यर, खुद्द युजवेंद्र दिसत आहेत. शिवाय आणखी एक व्यक्तीही यात सर्वांचं लक्ष वेधत आहे. डोक्यावर टोपी घातल्यामुळे प्रथमदर्शनी या व्यक्तीचा चेहर लक्षात येत नाही. पण, क्रीडारसिकांनी त्यांची भूमिका अगदी योग्यपणे बजावत ही व्यक्ती कोण, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनीच याचं उत्तरही दिलं आहे. 

वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

युजवेंद्रने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये खेळाडूंचा नृत्याविष्कार पाहता बॉलिवूड कलाकारांना ते चांगलीच टक्कर देत आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. चहलने पोस्ट केलेला हा व्हिडिओ इतका गाजला की, सामना सुरु होण्यापूर्वीच्या चर्चेतही याविषयीच्या गप्पा मारल्या गेल्या. थोडक्यात काय, तर हा Off field performance अगदी योग्य पद्धतीने व्हायरल झाला हेच खरं.