IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात Washington Sundar आऊट, 'हा' खेळाडू होणार इन

विराट कोहलीचा शिलेदार राहूलच्या नेतृत्वात मैदानात उतरणार, बॉलिंगसह बॅटींगमध्येही दाखवू शकतो कमाल, कोण आहे हा खेळाडू 

Updated: Aug 16, 2022, 03:04 PM IST
IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात Washington Sundar आऊट, 'हा' खेळाडू होणार इन  title=

मुंबई : टीम इंडिया 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदरची (washington sundar) भारतीय संघात निवड करण्यात आली होती. मात्र खांद्याच्या दुखापतीमुळे तो या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे बीसीसीआयने वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदला (shahbaz ahmad) संघात संधी दिली आहे. तो प्रथम टीम इंडियाच्या (team india) सिनियर संघातून खेळणार आहे.त्यामुळे त्याच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.  

इंग्लंडमधल्या काऊंटी क्रिकेट सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला (washington sundar) खांद्याला दुखापत झाली होती. या खांद्याच्या दुखापतीमुळे आता झिम्बाब्वे विरूद्धच्या मालिकेतून वॉशिंग्टन सुंदर बाहेर झाला आहे. सुंदरच्या जागी शाहबाज अहमदचा संघात समावेश करण्यात आला आहे.  
 
कोण आहे हा खेळाडू? 
शाहबाजने (shahbaz ahmad) देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा एक भाग आहे. शाहबाज देशांतर्गत सामन्यांमध्ये बंगाल संघाकडून खेळतो. तो भारत अ संघाकडूनही खेळला आहे. पण आता पहिल्यांदाच भारतीय संघातून खेळण्याचा मान त्याला मिळणार आहे.  

आकडे काय सांगतात? 
शाहबाज (shahbaz ahmad)  हा स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे. तो संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकल्यास तो प्रभावी ठरला आहे. शाहबाजने प्रथम श्रेणी सामन्यांच्या 29 डावांमध्ये 1041 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत. यासोबतच त्याने 57 विकेट्सही घेतल्या आहेत. शाहबाजने लिस्ट ए मध्ये 26 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 662 धावा केल्या आहेत. यासह त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 24 विकेट्स घेतल्या आहेत. शाहबाजने आयपीएलमध्ये 29 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 13 विकेट्स घेण्यासोबत 279 धावा केल्या आहेत.

शाहबाज  (shahbaz ahmad) हे आकडे पाहता त्याच्यासाठी टीम इंडियात खेळण्याची मोठी सुवर्णसंधी आहे. आता या संधीच तो सोन करतो का हे झिम्बाब्वे मालिकेतून कळणार आहे.  

भारतीय संघ : केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन,ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर शाहबाज अहमद.