मुंबई : भारतीय क्रिकेट टीममधील अनेक खेळाडूंकडे लक्झरी कार आहेत. त्यात आता आणखी एका क्रिकेटरचा समावेश झाला आहे. महागड्या कार घेणाऱ्यांच्या यादीत आता सूर्यकुमार यादवचा ही समावेश झाला आहे. भारतीय संघाचा सदस्य सूर्यकुमार यादवने नवीन मर्सिडीज-बेंझ जीएलई कूप कार खरेदी केली आहे. (Suryakumar Yadav New car)
सूर्यकुमारने खरेदी केलेल्या या कारमध्ये खास फीचर आहेत. ते देखील आपण पाहणार आहोत. पण या कारची किंमत 2.15 कोटी आहे. अनेक फीचर या कारला आणखी महत्त्वाची बनवतात.
मर्सिडीज-बेंझ जीएलई कूप (mercedes-benz gle coupe Price) ची किंमत भारतीय बाजारात 2.15 कोटी इतकी आहे. त्यामुळे किंमत आणि फीचरच्या बाबतीत ती इतर वाहनांच्या तुलनेत ही वरचढ ठरते.
भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील रोल्स रॉयस खरेदी करणार असल्याची चर्चा आहे. रोल्स रॉयस (Rolls-Royce) ही सध्याच्या काळातील सर्वात प्रीमियम कार मानली जाते.
सूर्यकुमार यादव यांच्याकडे BMW 5 Series 530d M Sport, Audi A6, Range Rover, Hyundai i20, Fortuner यासह लक्झरी कारचा संग्रह आहे. याशिवाय त्याच्याकडे सुझुकी हायाबुसा आणि हार्ले-डेव्हिडसन यांसारख्या स्पोर्ट्स बाइक्सही आहेत.
भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने शुक्रवारी रोल्स रॉयससह एक फोटो शेअर केला. पोस्टमध्ये क्रिकेटर कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसत आहे. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान हा फोटो क्लिक करण्यात आला होता.