IND vs ZIM, 4th T20 : टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात 23 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील चौथा (Ind vs Zim 4th T20I) टी-ट्वेंटी सामना 13 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता खेळवला जाईल. मात्र, या सामन्यात सर्वांच्या नजरा असणार आहेत, कॅप्टन शुभमन गिलच्या एका निर्णयावर..!
पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजीची राख झाली. कोणत्याही फलंदाजाला मैदानात उभा राहता आलं नाही. तर दुसऱ्या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा याने धमाकेदार शतक ठोकलं अन् टीम इंडिया चॅम्पियन का आहे? याचं सर्वांना उत्तर दिलं. तर तिसऱ्या सामन्यात शुभमनचा निर्णय चुकला. वर्ल्ड कप टीममधून आलेल्या यशस्वी जयस्वालला संघात स्थान दिल्याने अभिषेक शर्माला तिसऱ्या क्रमांकावर खेळावं लागलं अन् टीम इंडियाचा गेम प्लॅन फसला.
यशस्वील सलामीला आला मात्र, त्याला साधं अर्धशतक देखील पूर्ण करता आलं नाही. तर अभिषेक शर्माला देखील तिसऱ्या क्रमांकावर नीट खेळता आलं नाही. अशातच आता शुभमन गिलने अभिषेक शर्माला सलामीला पाठवलं तर टीम इंडियाला येत्या काळात विरेंद्र सेहवागसारखा तगडा आक्रमक खेळाडू मिळू शकतो. त्यामुळे शुभमन गिलचा एक निर्णय टीम इंडियासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरू शकतो.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद.
झिम्बाब्वेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: तादिवानाशे मारुमणी, वेस्ली मधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जॉनथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.