Rohit Sharma : ...म्हणून 7 व्या क्रमांकावर फलंदाजी केली; विजयानंतर कर्णधार रोहितचा मोठा खुलासा

Rohit Sharma : गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. वनडे वर्ल्डकप तोंडावर असताना हा फलंदाजीच्या क्रमाचा हा प्रयोग पूर्णपणे फसलेला दिसला. ओपनिंगला आलेला रोहित शर्मा ( Rohit Sharma ) सातव्या क्रमांकावर उतरला होता. दरम्यान या प्रयोगाबाबत अखेर रोहित शर्माने मौन सोडलं आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 28, 2023, 06:19 PM IST
Rohit Sharma : ...म्हणून 7 व्या क्रमांकावर फलंदाजी केली; विजयानंतर कर्णधार रोहितचा मोठा खुलासा  title=

Rohit Sharma : टेस्टनंतर आता भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( Ind vs WI ) यांच्यात वनडे सिरीजला सुरुवात झाली आहे. यावेळी गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. बारबाडोसमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात रडत-खडत भारताचा विजय झाला. या सामन्यात चाहत्यांना एक बदल दिसला तो म्हणजे फलंदाजीच्या क्रमाचा. मात्र वनडे वर्ल्डकप तोंडावर असताना हा फलंदाजीच्या क्रमाचा हा प्रयोग पूर्णपणे फसलेला दिसला. दरम्यान याबाबत सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) भाष्य केलंय. 

ओपनिंग जोडी बदलली

या सामन्यामध्ये शुभमन गिल आणि इशान किशन ओपनिंग करण्यासाठी मैदानावर उतरले होते. टीम इंडियाची ओपनिंग जोडी ही रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) अशी होती. मात्र वर्ल्ड कपसाठी एक वेगळी ओनपिंग जोडीचा प्रयोग करण्यात आला. यावेळी ओपनिंगला आलेला रोहित शर्मा ( Rohit Sharma ) सातव्या क्रमांकावर उतरला होता. दरम्यान या प्रयोगाबाबत अखेर रोहित शर्माने मौन सोडलं आहे. 

सामना संपल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला की, खरं सांगायचं तर मला माहिती नव्हतं की, पिच इतक्या पद्धतीने टर्न होईल. आम्ही गोलंदाजांना संधी मिळावी म्हणून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मला असंही वाटलं होतं की, वेगवान गोलंदाज आणि स्पिनर यांच्यासाठी फायदेशीर असेल. कमी स्कोर असून देखील आम्ही फलंदाजीमध्ये प्रत्येकाला संधी देणार होतो. 

रोहितला डेब्यू सामन्याची झाली आठवण

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुढे म्हणाला, "ज्या दिवशी मी डेब्यू केलं होतं त्या सामन्यात मला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायची होती. आज माझ्या पदार्पणाची आठवण झालीये. मुकेशने टेस्ट सामन्यात चांगली गोलंदाजी केली.  याशिवाय त्याने वनडे सामन्यात सामन्यातही चांगली कामगिरी करताना पाहून आनंद झालाय."

सूर्यकुमार यादवला तिसऱ्या तर हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीबाबत रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला, मला नाही वाटत की, त्यांना अशाप्रकारच्या अधिक संधी मिळतील. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. ईशान किशननेही चांगली फलंदाजी केली, असंही रोहित म्हणाला. 

सिरीजमध्ये टीम इंडिया आघाडीवर

पहिल्या वनडे सामन्यात जडेजा आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांच्या जोडीने अखेर टीमला विजय मिळवून दिला. या लक्ष्याचा पाठलाग करताना ईशानने 52 रन्स केले. तीन सामन्यांच्या या वनडे सिरीजमध्ये टीम इंडियाने ( Team India ) अखेर 1-0 अशी आघाडी घेतली आहे.