IND vs WI : शेवटच्या टी२० मध्ये उमेश, जसप्रीत, कुलदीपला आराम

जाणून घ्या, कुणाला मिळालीय संधी

Updated: Nov 9, 2018, 01:05 PM IST
IND vs WI : शेवटच्या टी२० मध्ये उमेश, जसप्रीत, कुलदीपला आराम title=

मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी२० मॅचसाठी उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना आराम देण्यात आलाय. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डनं (बीसीसीआय) शुक्रवारी जारी केलेल्या एका पत्रकात याबाबत माहिती देण्यात आलीय. भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान होणारी तिसरी आणि शेवटची टी२० मॅच ११ नोव्हेंबर रोजी चेन्नईमध्ये खेळली जाणार आहे. भारतीय टीमनं या सीरिजमध्ये २-०नं आघाडी घेतलीय. 

बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश, जसप्रीत आणि कुलदीपला संधी मिळावी यासाठी या तिन्ही खेळाडुंना या मॅचमध्ये आराम देण्यात आलाय. अशावेली अखिल भारतीय निवड समितीनं तिसऱ्या टी-२० मॅचसाठी भारतीय टीममध्ये सिद्धार्थ कौलचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय.

अशी असेल भारतीय टीम

टी-20 टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, क्रुणाल पांड्या, वाशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, शाहबाज नदीम आणि सिद्धार्थ कौल