IND vs WI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया यजमान वेस्ट इंडिजसोबत कसोटी सामने खेळणार आहे. यासोबतच दोन्ही टीममध्ये एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या टिममध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा देखील समावेश आहे. दरम्यान मोहम्मद शमीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भारतीय संघ व्यवस्थापनाला वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती देण्याची विनंती केली आहे. सप्टेंबरपासून भारतीय संघाचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे. स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती हवी आहे, अशी विनंती मोहम्मद शमीने केली आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड झाली आहे. मात्र आता शमीने आपली बाजू संघ व्यवस्थापनासमोर ठेवली आहे. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
Mohammad Shami requested the team management for the rest in the West Indies series as he needs to be fresh for the busy schedule from september.(Reported by Indian Express).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 26, 2023
यंदाचा विश्वचषक २०२३ भारतीय भूमीवर होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये यंदाच्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं (ICC World Cup 2023) वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारतामधील एकूण 10 शहांमध्ये 46 दिवसांमध्ये 48 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील दोन्ही महत्त्वाचे सामने म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यानचा सामना 15 ऑगस्ट रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तसेच स्पर्धेचा अंतिम सामनाही अहमदाबादच्या मैदानात खेळवला जाणार आहे. भारतामधील एकूण 10 शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार असले तरी या 46 सामन्यांपैकी केवळ 9 सामने महाराष्ट्रात खेळवले जाणार आहे.
भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबई मध्ये 4 सामने खेळवले जाणार आहेत. तर आश्चर्यकारकरित्या पुण्याचीही निवड या स्पर्धेतील सामने भरवण्याची करण्यात आली आहे. पुण्याचं नाव संभाव्य शहरांच्या यादीमध्येही नव्हतं. मात्र पुण्यामध्ये मुंबईपेक्षाही एक सामना अधिक खेळवला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांबरोबरच पुणेकरांनाही या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा प्रत्यक्षात मैदानात जाऊन आनंद घेता येणार आहे. दरम्यान ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते, असे मानले जात आहे. सोमवारी वृत्तसंस्था एएनआयने वृत्त दिले की 2023 विरुद्ध भारतात 12 मैदानांवर विश्वचषक खेळवला जाईल. तर या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.