Ind vs WI 3rd ODI: सिरीज जिंकण्यासाठी रोहित-विराट करणार कमबॅक; प्लेईंग 11 मधून या खेळाडूंना मिळणार डच्चू

India vs West Indies 3rd ODI : सिरीज जिंकण्यासाठी निर्णायक सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं कमबॅक होणं जवळपास निश्चित मानलं जातंय. तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर नजर टाकूया.

सुरभि जगदीश | Updated: Jul 31, 2023, 12:07 PM IST
Ind vs WI 3rd ODI: सिरीज जिंकण्यासाठी रोहित-विराट करणार कमबॅक; प्लेईंग 11 मधून या खेळाडूंना मिळणार डच्चू  title=

India vs West Indies 3rd ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या वनडे सिरीज सुरु असून तिसरा वनडे सामना शेवटचा आणि निर्णायक ठरणार आहे. पहिल्या वनडे सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र टीम इंडियाचा दारूण पराभव झाला. दुसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा टीममध्ये समावेश नव्हता. त्यामुळे आता सिरीज जिंकण्यासाठी निर्णायक सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं कमबॅक होणं जवळपास निश्चित मानलं जातंय. तिसऱ्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, हे पाहूयात.

रोहित-विराटचं होणार कमबॅक

वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडिया काही नवीन प्रयोग करताना दिसतेय. यावेळी दुसऱ्या वनडे सामन्यात टीमचे प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आराम देण्यात आला होता. मात्र या सामन्यात टीम इंडियाचा 6 विकेट्सने पराभव झाला होता. या सामन्यात इशान किशन आणि शुभमन गिल यांनी ओपनिंग केलं. मात्र तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माचं कमबॅक करू शकतो. 

तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या कमबॅकमुळे किशनला मधल्या फळीत खेळवण्यात येईल. कारण रोहितने ओपनिंग करताना टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकवून दिलेत. या स्थानावर फलंदाजी करताना त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरवलं जाऊ शकतं. 

मिडल ऑर्डर कशी असेल?

टीम इंडियात इशान किशनकडे विकेटकीपिंगची जबाबदारी देण्यात येईल. वेस्ट इंडिजविरूद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये इशानने चांगली कामगिरी करत अर्धशतके झळकावलंय. पहिल्या सामन्यात 52 आणि दुसऱ्या सामन्यात 55 रन्स केलेत. दरम्यान स्वतःचं स्थान तयार करण्यासाठी सूर्यकुमार यादवला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. हार्दिक पांड्याला सहाव्या क्रमांकावर मैदानात उतरवले जाऊ शकते. 

गोलंदाजी डिपार्टमेंट कसं असेल?

टीम इंडियाकडे या दौऱ्यावर अनुभवी वेगवान गोलंदाजीची कमतरता आहे. उमरान मलिक टीम इंडियासाठी कमाल दाखवू शकला नाही. शार्दुलने चांगली गोलंदाजी केली आहे. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाकडे स्पिनिंगची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. 

संजू सॅमसनला मिळणार डच्चू?

तिसऱ्या वनडे सामन्यात अखेर संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती. मात्र त्याला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. या सोबत अक्षर पटेल आणि उमरान मलिक यांचाही टीममध्ये समावेश होण्याची शक्यता कमी आहे.

तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, शार्दुल ठाकुर