Ind vs SL: टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनाला मोठा झटका मिळणार?

भारत विरुद्ध श्रीलंका वन डे सामना 18 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे.

Updated: Jul 17, 2021, 04:03 PM IST
Ind vs SL: टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनाला मोठा झटका मिळणार? title=

मुंबई: भारत विरुद्ध श्रीलंका वन डे सामना 18 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाची कमान शिखर धवनच्या खांद्यावर देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये चॅम्पियनशिप पराभूत झाल्यानंतर आता श्रीलंका दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. श्रीलंक विरुद्ध भारत 3 वन डे सामने आणि 3 टी 20 सामन्यांची सीरिज खेळवण्यात येणार आहे.

एकीकडे श्रीलंका विरुद्ध इंग्लंड सीरिजमध्ये श्रीलंका वन डे सीरिज पराभूत झाल्यानं टीम इंडियाचा विश्वास वाढला आहे. श्रीलंका टीममध्ये भलेही उत्तम खेळाडूंची कमतरता असेल मात्र त्यांचं प्रदर्शन आणि कामगिरी कायमच चांगली राहिली आहे. यावेळी जरी श्रीलंका टीमवर कोरोनाचं संकट असलं, एक फलंदाज जखमी असला तरी टीम इंडियाला निर्धास्त राहून चालणार नाही.

टीम इंडियाला घरच्या मैदानवर 345 वन डे सामन्यांपैकी 202 सामने जिंकण्यात यश आलं आहे. 131 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघाने घरच्या मैदानात फक्त 89 सामने गमावले आहेत. म्हणजेच त्यांची कामगिरी टीम इंडियाच्या बरोबरीची आहे. युवा संघ दौर्‍यावर भारत गेला आहे. राहुल द्रविडला संघाचा प्रशिक्षक बनविण्यात आले आहे.

भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, ईशान किशन, संजू सॅमसन, राहुल चाहर, युजवेंद्र चहल, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.