सामना जिंकूनही रोहित शर्मा नाराज; 'या' खेळाडूमुळे राग अनावर

सामन्यानंतर रोहित शर्माने काही खेळाडूंचं कौतुक केलंय. मात्र एका खेळाडूवर त्याने संताप व्यक्त केला आहे.

Updated: Feb 25, 2022, 07:57 AM IST
सामना जिंकूनही रोहित शर्मा नाराज; 'या' खेळाडूमुळे राग अनावर title=

दिल्ली : वेस्ट इंडिजनंतर श्रीलंका टीम आता भारताच्या दौऱ्यावर आली आहे. श्रीलंकेविरूद्ध टी-20 सिरीज सुरु झाली असून पहिला सामना टीम इंडियाने 62 रन्सने विजय मिळवला. दरम्यान टीम इंडियाच्या विजयामुळे कर्णधार रोहित शर्मा फार खूश आहे. सामन्यानंतर त्याने काही खेळाडूंचं कौतुक केलंय. मात्र एका खेळाडूवर त्याने संताप व्यक्त केला आहे.

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर वेंकेटेश अय्यरने (Venkatesh Iyer) एक सोप कॅच सोडला. आणि याच कारणामुळे रोहित शर्मा नाराज दिसला. इतंकच नव्हे तर टीम इंडियाने या सामन्यात अजून दोन कॅचंही सोडले.

सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, "सतत त्याच चुका होतायत. आम्ही सोपे सोपे कॅचेस सोडून देतोय. फिल्डींग कोचना अजून काम करावं लागणार आहे. मिशन ऑस्ट्रेलियापूर्वी आम्हाला एक चांगली फिल्डींग टीम तयार करायची आहे. यापुढे हे सहन केलं जाणार नाही."

टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 137 धावाच करता आल्या. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

श्रीलंकेकडून चरिथ असलंकाने सर्वाधिक नाबाद 53 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त काही खेळाडूंना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी वेळीच रोखलं. 

टीम इंडियाकडून वेंकटेश अय्यर आणि भुवनेश्वर कुमार या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर युजवेंद्र चहल आणि रवींद्र जाडेजा या दोघांनी प्रत्येकी एका खेळाडूला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.