Sri lanka vs india ODI : टी-ट्वेंटी मालिकेत श्रीलंकेला क्लिन स्विप दिल्यानंतर टीम इंडियाने वनडे मालिकेत निराशाजनक प्रदर्शन केलं. कॅप्टन रोहित शर्मा सोडला तर इतर कोणत्याही फलंदाजांना मोठी खेळी करता येत नाहीये. पहिल्या वनडे सामन्यात अर्शदीप सिंगला एक धाव घेता न आल्याने सामना टाय झाला. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरने (Super Over provision) निकाल लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सुपर ओव्हर झाली नाही अन् सामना अनिर्णयीत राहिला. सुपर ओव्हर का झाली नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
एका श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने पुष्टी केली की आयसीसीच्या नियमांनुसार आणि सामना खेळण्याच्या परिस्थितीनुसार पहिल्या वनडे सामन्यात सुपर ओव्हर आयोजित करण्याचा पर्याय होता, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. त्यामुळे सुपर ओव्हर न खेळवण्याचा निर्णय कोणाचा होता? मॅच रेफरीचा की फोर्थ अंपायर्सचा? असा सवाल विचारला जात आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना जर पहिल्या सामन्यासारखा टाय झाला तर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे होणार आहे. आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे.
श्रीलंकेच्या संघाने टॉस जिंकून बॅटिंग करत टीम इंडियासमोर 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात कॅप्टन रोहित शर्माने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाची चांगली सुरुवात झाली. मात्र रोहित आऊ झाल्यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स टाकल्या. त्यामुळे टीम इंडिया 48 व्या ओव्हरमध्येच 230 ऑलआऊट झाली. 14 बॉल बाकी असताना टीम इंडियाला केवळ 1 धावेची गरज होती. मात्र, अर्शदीपने फटका मारण्याचा नादात विकेट गमावली आणि सामना टाय झाला.
श्रीलंका (संभाव्य प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.
टीम इंडिया (संभाव्य प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.