कोलंबो : सध्या फॉर्मात असलेली कॅप्टन कोहलीची भारतीय क्रिकेट टीम आणखी एक टेस्ट सीरीज आपल्या घशात घालण्याच्या प्रयत्नात आहे.
श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट मॅच एकतर्फी जिंकून आता गुरुवारपासून दुसऱ्या टेस्टमध्ये दोन्ही टीम्सची कसोटी लागणार आहे. दुसरी मॅच सिंघली स्पोटस क्लब मैदानावर खेळली जाईपल. भारतानं पहिल्या मॅचमध्ये ३०४ रन्सनं यजमानांना मात दिली होती. या मॅचमध्ये शिखर धवन, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीनं शतक ठोकले होते.
पहिल्या मॅचमध्ये सलामी बॅटसमन लोकेश राहुल ताप आल्यानं खेळू शकला नव्हता. पण आता मात्र तो फीट आहे त्यामुळे तो टीममध्ये परतू शकतो. अशावेळी गेल्या वेळच्या शिखर धवन आणि अभिनव मुकुंद या सलामी जोडीपैंकी एकाला टीममधून बाहेर पडावं लागू शकतं. मुकुंदची बाहेर पडण्याची शक्यता जास्त आहे.
याशिवाय टीम इंडियामध्ये फारसा बदल अपेक्षित नाही. बॉलर्सच्या टीममधल्या बदलाबद्दलही शक्यता कमीच आहे. स्पिनची धुरा रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या जोडीवर असेल. मोदम्मद शमी आणि उमेश यादव यांचा वेग साथीला असेलच.
भारत :- विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उप-कॅप्टन), लोकेश राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, रिद्धिमान साहा, ईशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद
श्रीलंका : दिनेश चांडीमल कॅप्टन), एन्जेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा, दीमुथ करुणारत्ने, निरोशन डिकवेला, कुशल मेंडिस, धनंजय डी सिल्वा, दानुष्का गुनाथिलका, लाहिरू कुमारा, विश्व फनार्डो, नुवान प्रदीप, रंगना हेराथ, दिलरुवान परेरा, मलिंदा पुष्पककुमार, लक्षण संदनकान, लाहिरू थिरिमाने