IND vs SL: "माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून...", दासुन शनाकाबाबत गौतम गंभीरची मोठी भविष्यवाणी!

Gautam Gambhir On Dasun Shanaka : श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका सध्या टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शनाकाने फक्त 22 चेंडूत 56 धावा केल्या आणि सामनावीरचा किताब पटकावला.

Updated: Jan 7, 2023, 05:53 PM IST
IND vs SL: "माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून...", दासुन शनाकाबाबत गौतम गंभीरची मोठी भविष्यवाणी! title=
Gautam Gambhir,Dasun Shanaka

Gautam Gambhir : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्याच खेळल्या जात असलेल्या टी-ट्वेंटी (IND vs SL 3rd T20I) मालिकेतील तिसरा सामना आज खेळला जाणार आहे. सिरीज जिंकण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना करो या मरो असा असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ पुर्ण तयारीनिशी उतरतील. दुसऱ्या सामन्यात कॅप्टन दासुन शनाकाने (Dasun Shanaka) वादळी खेळी करत भारतीय गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. अशातच आता टीम इंडियाचा (Team India) माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मोठी भविष्यवाणी केली आहे. (IND vs SL Gautam Gambhir big prediction about Sri Lanka captain Dasun Shanaka in ipl auction marathi news)

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका सध्या टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शनाकाने फक्त 22 चेंडूत 56 धावा केल्या आणि सामनावीरचा किताब पटकावला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. मात्र लिलावात (IPL Auction) त्याच्यावर कोणत्याही संघानं बोली लावली नाही. त्यावरून गौतम गंभीरने मोठं भाष्य केलंय.

काय म्हणाला गौतम गंभीर?

माझ्याकडे पैसे नाहीत, म्हणून मी बोली लावली नाही. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे. कल्पना करा की ही मालिका लिलावाच्या आधी घडली असती तर काही फ्रँचायझींकडे त्यांना विकत घेण्यासाठी पैसे असले असते, असं गौतम गंभीर  (Gautam Gambhir On Dasun Shanaka) म्हणतो.

आणखी वाचा - BCCI ची निवड समिती अखेर जाहीर; अध्यक्षपदी पुन्हा चेतन शर्मा तर 'या' दिग्गजांना संधी

दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना (India vs Sri Lanka, 3rd T20I) राजकौटच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल, त्याच्या खिश्यात मालिका जाणार आहे. त्यामुळे आजचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच दोन्ही संघ येत्या 10 तारखेपासून वनडे (IND vs SL 1st ODI) सामना देखील खेळणार आहेत.