IND vs SA : मैदानाबाहेर सूर्याची 'दादागिरी'? अर्शदीप सिंगवर का रागावला कॅप्टन? धक्कादायक Video समोर

Suryakumar Yadav Viral Video : मैदानाबाहेर सूर्यकुमार यादव दादागिरी करतोय का? असा सवाल सध्या नेटकरी विचारत आहेत. त्याचा कारण समोर आलेला व्हिडीओ...

सौरभ तळेकर | Updated: Dec 16, 2023, 05:18 PM IST
IND vs SA : मैदानाबाहेर सूर्याची 'दादागिरी'? अर्शदीप सिंगवर का रागावला कॅप्टन? धक्कादायक Video समोर title=
IND vs SA Suryakumar Yadav

Suryakumar Yadav Angry on Arshdeep Singh : सध्या साऊथ अफ्रिका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने टी-ट्वेंटी (IND vs SA) मालिकेत नव्या छाव्यांचा दम दाखवून दिला आहे. पहिला सामना पावसात धुवून निघाल्यानंतर दुसऱ्या सामन्यातील पराभवामुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती. मात्र, तिसऱ्या सामन्यात साऊथ अफ्रिका 106 धावांनी लोळवत सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वात मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आलंय. अशातच आता कॅप्टन सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये सूर्या अर्शदीप सिंगवर संतापल्याचं पहायला मिळतंय.

सूर्यकुमार यादवने टी-ट्वेंटी मालिकेत आपल्या नेतृत्वाची छाप सोडली आहे. स्वत: जबाबदारी देऊन मैदानात शांततेच नियोजन करून टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात सूर्याचा खूप मोठा वाटा राहिलाय. मात्र, मैदानाबाहेर सूर्यकुमार यादव दादागिरी करतोय का? असा सवाल सध्या नेटकरी विचारत आहेत. त्याचा कारण समोर आलेला व्हिडीओ... यामध्ये सूर्यकुमार यादव अर्शदीर सिंगला कोणत्यातरी कारणावरून रागावताना दिसतोय. दोघांमध्ये नेमकं काय झालं? याचं उत्तर अजूनही समोर आलं नाही.  जेव्हा टीम इंडिया बसमधून हॉटेलकडे जात होती, तेव्हा हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

पाहा Video

भारत आणि आफ्रिका वनडे मालिकेतील पहिला सामना उद्या रविवारी (17 डिसेंबर) खेळवला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करेल. तर एडन मार्कराम दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना 19 डिसेंबर रोजी गकेबरहा येथे खेळवला जाईल आणि तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना 21 डिसेंबर रोजी होईल.

टीम इंडिया - ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल. , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि आकाश दीप.

दक्षिण आफ्रिका- एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्गर, टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली मपोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर डसेन, काइल वेरिने, लिझार्ड विल्यम्स.