मुंबई : वर्ल्डकपमध्ये आता टीम इंडिया सध्या मिशन दक्षिण आफ्रिकेच्या तयारीत आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. पाकिस्ताननंतर भारताने नेदरलँड्लसाही धुव्वा उडवला. उद्या म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी पर्थच्या मैदानावर टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेशी मुकाबला होणार आहे. दरम्यान हा सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न टीम इंडिया करणार असून यासाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेईंग 11 मध्ये बदल करण्याची शक्यता आहे.
वर्ल्डकपच्या सुरुवातीपासूनच ओपनर के.एल राहुल फ्लॉप ठरताना दिसतोय. पाकिस्तान आणि नेदरलँड्स या दोन्ही टीम्सविरूद्ध त्याचा खेळ चांगला झाला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मासोबत राहुलला संधी मिळेल का याबाबत शंका व्यक्त करण्यात येतेय.
विराट कोहली भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर असलेला सर्वात विश्वासू फलंदाज ठरलाय. कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध 82 रन्सची खेळी केली होती. तर दुसरीकडे नेदरलँडविरूद्ध त्याने 62 रन्सची खेळी केली होती.
सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळणं पक्क आहे. त्याने नेदरलँड्सविरुद्ध जलद गतीने अर्धशतक झळकावलं होतं. तर हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर उतरणार आहे. दिनेश कार्तिककडे विकेटकिपिंगची जबाबदारी देण्यात येईल.
फास्ट गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात येणारे. त्याला साथ देण्यासाठी अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमीला यांची साथ मिळेल. तर स्पिनरची जबाबदारी अक्षर पटेलकडे असेल. या सामन्यात कदाचित रविचंद्रन अश्विनच्या जागी युझवेंद्र चहलला संधी देण्यात येऊ शकते.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल.