Ind Vs SA : 1 बॉल, 2 फलंदाज, दोघेही आऊट...तरीही गेला नाही एकंही विकेट!

कालच्या सामन्यात असा प्रसंग आला की प्रत्येकाला त्याचं आश्चर्य वाटलं.

Updated: Oct 5, 2022, 07:58 AM IST
Ind Vs SA : 1 बॉल, 2 फलंदाज, दोघेही आऊट...तरीही गेला नाही एकंही विकेट! title=

इंदौर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील तिसरा टी20 सामना मंगळवारी इंदूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात अनेक आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळाल्या. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी रन्सचा पाऊस पाडला. पण असा प्रसंग आला की प्रत्येकाला त्याचं आश्चर्य वाटलं. कारण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने स्वतःच्या पायाने स्टंप उडवले, पण त्यानंतरही तो नाबाद राहिला.

विशेष म्हणजे एकाच चेंडूवर दोन फलंदाज दोनदा बाद झाले आणि त्यानंतरही विकेट पडली नाही. ही गोष्ट खूपच गोंधळात टाकणारी आहे. मात्र यावेळी नेमकं काय घडलं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

भारतासाठी मोहम्मद सिराजने 17 वी ओव्हर फेकली. संपूर्ण ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजने 8 रन्स केले. मात्र या ओव्हरमध्ये एक मोठी घटना पहायला मिळाली. मोहम्मद सिराजने 17व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर नो बॉल टाकला, जो उंचीमुळे नो बॉल देण्यात आला होता.

हा बॉल टी. स्टब्सने खेळला आणि दुसरीकडे उमेश यादवने हा कॅच घेतला. पण तो नो-बॉल होता, त्यामुळे स्टब्स नाबाद होता. यामुळे दक्षिण आफ्रिकेला फ्री-हिट मिळाली, मोहम्मद सिराज हा बॉल टाकला तेव्हा रॉसो फ्री-हिटचा फायदा घेण्यासाठी क्रीजच्या खूप मागे येत होता, त्यादरम्यान त्याचा पाय स्टंपला लागला आणि स्टंप उडाले.

मात्र ती फ्री-हिट होता आणि बॉलही टाकला नव्हता त्यामुळे तो नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज एकाच चेंडूवर दोनदा बाद झाले आणि दोन्ही वेळा नाबाद राहिले.

दक्षिण आफ्रिकेचा विजय

दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर 228 धावाचं आव्हान ठेवलं होतं. 228 धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पत्त्यासाठी ढासाळली. रोहित शर्माला भोपळा फोडता आला नाही. दिनेश कार्तिकने सर्वाधिक 46 धावा केल्या. मात्र, इतर कोणत्याही खेळाडूला मोठी कामगिरी करता आली नाही. दीपक चहरने अखेरीस फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याने 17 बॉलमध्ये 31 धावा केल्या. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.