IND vs SA 1st Test | उपकर्णधार K L Rahul चं आफ्रिके विरुद्ध खणखणीत शतक

केएल राहुलच्या (K L Rahul) कसोटी कारकिर्दीतील हे 7 वं शतक ठरलंय. 

Updated: Dec 26, 2021, 08:45 PM IST
IND vs SA 1st Test | उपकर्णधार K L Rahul चं आफ्रिके विरुद्ध खणखणीत शतक title=

सेंचुरियन : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील (IND vs SA 1st Test) पहिल्याच दिवशी टीम इंडियाचा सलामीवीर आणि उपकर्णधार  केएल राहुलने (K L Rahul) खणखणीत शतक ठोकलं आहे. केएलने चौकार ठोकत शतक पूर्ण केलं आहे. केएलच्या कसोटी कारकिर्दीतील हे 7 वं शतक ठरलंय. (IND vs SA 1st Test Day 1 Team India Opener Vice Captain K L Rahul Scored Century Against South Africa at SuperSport Park Centurion)  

केएलने 218 चेंडूत 14 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने शतक पूर्ण केलं. केएलचं आफ्रिका विरुद्धचं हे पहिलं कसोटी शतक ठरलं. तसेच केएल आफ्रिकेत शतक लगावणारा 10 वा भारतीय ठरला आहे. 

दुसराच ओपनर

केएल राहुल आफ्रिकेत शतक लगावणारा दुसराच ओपनर बॅट्समन ठरला आहे. याआधी वसीम जाफरने हा कारनामा केला होता. जाफरने 2007 मध्ये केपटाऊनमध्ये ही कामगिरी केली होती. 

कसोटी कारकीर्दीला 7 वर्ष पूर्ण 

विशेष बाब म्हणजे केएल राहुलने आजच्याच दिवशी 7 वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेट पदार्पण केलं होतं. केएलने 26 डिसेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्नमध्ये टेस्ट डेब्यू केलं होतं.  

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | विराट कोहली (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.